नागमठाण भगूर रस्त्याची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:06 AM2021-09-27T04:06:17+5:302021-09-27T04:06:17+5:30
कोविडमुळे राज्य सरकारकडून निधीची कपात झाली. तर कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतरदेखील निधी उपलब्ध न झाल्याने मंजुरी मिळूनदेखील रस्त्याचे काम ...
कोविडमुळे राज्य सरकारकडून निधीची कपात झाली. तर कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतरदेखील निधी उपलब्ध न झाल्याने मंजुरी मिळूनदेखील रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागमठाण, भगूर परिसरातील नागरिकांना पुढील काळात सहा महिने तरी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
गंगथडी भागातील नागमठाण ते भगूर या राज्य मार्ग क्रमांक २१६ च्या १२ किमी. लांबीच्या कामासाठी साधारणत: दोन वर्षांपूर्वी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम कंत्राटदार एस. आर. ठोंबरे यांना देण्यात आले होते. त्यांनी जातेगावपासून नागमठाणपर्यंतचे जवळपास सहा किमीचे काम अद्याप पूर्ण केले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्याची अवस्था अशी होत असेल तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
---
कोट :
कोविडमुळे तालुक्यातील बहुतेक कामांना निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ही कामे रखडली आहेत. त्यात नागमठाणच्या पुलाचाही समावेश आहे. मात्र, दिवाळीनंतर भगूर रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल. -एस. बी. काकड, उपअभियंता, बांधकाम विभाग, वैजापूर.
---------
फोटो कॅप्शन - वैजापूर तालुक्यातील नागमठाण ते भगूर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.