बजाजच्या ३१ अस्थायी कामगारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:03 AM2021-04-29T04:03:26+5:302021-04-29T04:03:26+5:30
औरंगाबाद : बजाज कंपनीतील ३१ अस्थायी कामगारांना ३९ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ...
औरंगाबाद : बजाज कंपनीतील ३१ अस्थायी कामगारांना ३९ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कामगार न्यायालयाचे न्यायाधीश डी. व्ही. जाेशी आणि न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी दोन स्वतंत्र निकालाद्वारे दिले होते.
बजाज ऑटाे लिमिटेडने ३१ पैकी २७ जणांना धनादेश अदा केले आहेत. तर ४ जणांना २ मे राेजी धनादेश देण्यात येणार आहेत.
वेल्डर, फिटर, टर्नर, मेकॅनिक, ग्राईंडर आदी पदांवर १९९० पासून काम करणाऱ्या १९४ अस्थायी कामगारांनी औरंगाबादच्या कामगार न्यायालयात ॲड. संदीप राजेभाेसले यांच्यामार्फत औद्याेगिक विवादाच्या तक्रारी दाखल केल्या हाेत्या. त्यापैकी ६० कामगार न्यायालयात साक्षीसाठी हजर राहिले. तक्रारीत म्हटल्या नुसार व्यवस्थापन कामगारांना ७ महिनेच काम देत असे. त्यानंतर कामावरून कमी करत असे. कामगारांच्या वर्षाच्या सेवेचे २४० दिवस पूर्ण हाेऊ न देता त्यांना कायमस्वरूपी नाेकरीचा हक्क मिळू देत नव्हते.
तक्रार अर्ज निकाली काढताना कामगार न्यायालयाने कामगारांना त्यांच्या सेवेचा कालावधी, त्यांनी उचललेला अंतिम पगार याचा हिशेब करून त्याप्रमाणे येणारी नुकसान भरपाई कामगारांना अदा करण्याचे आदेश कंपनीला दिले होते.