हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार! पावसाअभावी लागवड क्षेत्र घटल्याचे परिणाम

By प्रशांत तेलवाडकर | Published: October 12, 2023 07:15 PM2023-10-12T19:15:26+5:302023-10-12T19:16:24+5:30

जर राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातून बाजरीची आवक झाली तर भाव स्थिर राहतील

bajara bhakari will be expensive in winter! Effects of reduced cultivated area due to lack of rainfall | हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार! पावसाअभावी लागवड क्षेत्र घटल्याचे परिणाम

हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार! पावसाअभावी लागवड क्षेत्र घटल्याचे परिणाम

छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. राजस्थानातून येणारी बाजरी थोडी काळपट आहे. यामुळे चांगल्या बाजरीला भाव चढणार आहे. हिवाळ्यात गरम बाजरीची भाकरी खाण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. जर राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातून बाजरीची आवक झाली तर भाव स्थिर राहतील, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

बाजरी सध्या ३२ रुपये किलो
सध्या बाजारात राजस्थानची जुनी बाजरी विक्रीला येत आहे. ३० ते ३२ रुपये किलोने विकत आहे, तर काळपट बाजरी २६ ते २८ रुपयांपर्यंत विकली जात आहे.

जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र किती ?
जिल्ह्यात बाजरीचे एकूण क्षेत्र ३१९०४ हेक्टर आहे. त्यात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र १५३६८ हेक्टर एवढे आहे. म्हणजे यंदा ४८ टक्कांनी पेरणी क्षेत्र कमी झाले आहे.

या जिल्ह्यातून होते आवक
छत्रपती संभाजीनगरात आसपासच्या जिल्ह्यातून, तसेच राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातूनही बाजरीची आवक होत असते.

नवीन बाजरीत किती भाववाढ होईल
नवीन बाजरीची आवक नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होईल. यंदा पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे बाजरीच्या भावात किलोमागे ३ रुपये भाव वाढतील. सध्या ३२ विक्री होणारी बाजरी येत्या दोन महिन्यांत ३५ रुपये किलोपर्यंत विकली जाईल.
-स्वप्नील मुगदिया, व्यापारी

भाव स्थिर राहतील
यंदा राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशात बाजरीचे पीक समाधानकारक आहे. या राज्यातून मोठ्या संख्येने नवीन बाजरी बाजारात आली तर भाव स्थिर राहतील.
-प्रशांत खटोड व्यापारी

भाकरी ४० रुपयांपर्यंत
सध्या रेस्टाॅरंटमध्ये २० ते ४० रुपयांना एक नग बाजरीची भाकरी मिळत आहे. विशेषत: हॉटेल, ढाब्यावर बाजरीच्या भाकरीला जास्त मागणी असते.

Web Title: bajara bhakari will be expensive in winter! Effects of reduced cultivated area due to lack of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.