गुरुवारपासून उंडणगावात बालाजी उत्सवास प्रारंभ
By Admin | Published: May 20, 2014 01:25 AM2014-05-20T01:25:34+5:302014-05-20T01:33:39+5:30
उंडणगाव : येथील श्री बालाजी उत्सवास दि. २२ मे रोजी ध्वज उभारून सुरुवात होणार असून उत्सवाची सांगता (लळीत) ७ जून रोजी होणार आहे.
उंडणगाव : येथील श्री बालाजी उत्सवास दि. २२ मे रोजी ध्वज उभारून सुरुवात होणार असून उत्सवाची सांगता (लळीत) ७ जून रोजी होणार आहे. या उत्सवाची तयारी मंदिरात सुरू असून रंगरंगोटी, भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय आदी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील बालाजी मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध असून, हजारो भाविक येथे भेट देत असतात. उत्सव काळात होणारी गर्दी ध्यानात घेऊन सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्सवादरम्यान दररोज रात्री भजन, कीर्तन, संगीत रजनी, सीता स्वयंवर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण व रात्री ८ वाजता पालखी सोहळा आहे. दि. २३ मे रोजी भजन, निसर्गकन्या भजनी मंडळ, उंडणगाव, दि. २४ मे भजन, मुक्ताबाई भजनी मंडळ, उंडणगाव, दि. २५ मे कीर्तन- ह.भ.प. उद्धव महाराज सबलस पैठण, दि. २६ मे भजन- जय शिवाजी जय भवानी भजनी मंडळ, दि. २७ मे कीर्तन - विठ्ठल महाराज उमरीकर परभणी, दि. २८ मे कीर्तन ह.भ.प. ग्रामगीताचार्य रायजी प्रभू शेलोटकर, दि. २९ मे कीर्तन ह.भ.प. विठ्ठल महाराज शिंदे, औरंगाबाद, दि. ३० मे रोजी भजन - शबरी महिला भजनी मंडळ, उंडणगाव, दि. ३१ मे भजन- कीर्तन ज्ञानेश्वर महाराज कुकलारे, वेरूळ, दि. १ जून भजन रेणुका भजनी मंडळ, दि. २ जून कीर्तन ह.भ.प. रामेश्वर महाराज पवार निल्लोड, दि. ३ जून संगीत रजनी स्वरानंद संगीत दरबार, औरंगाबाद, दि. ४ जून रोजी भजन विठू माऊली वारकरी भजनी मंडळ, उंडणगाव, दि. ५ जून नारदीय कीर्तन ह.भ.प. साठे महाराज, औरंगाबाद, दि. ६ जून सीता स्वयंवर व दि. ७ जून रोजी लळीत. भाविकांनी ध्वजारोहण, पालखी सोहळा व अन्य कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन बालाजी संस्थानतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)