बालभवनास विद्यार्थ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:45 AM2017-09-27T00:45:36+5:302017-09-27T00:45:36+5:30
येथील जि. प. कन्या शाळेतील बालभवन विज्ञान केंद्रास वाशिम जिल्ह्यातील श्रीकृष्ण विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तोंडगाव येथील शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी भेट घेऊन विज्ञानरूपी धडे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जि. प. कन्या शाळेतील बालभवन विज्ञान केंद्रास वाशिम जिल्ह्यातील श्रीकृष्ण विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तोंडगाव येथील शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी भेट घेऊन विज्ञानरूपी धडे घेतले.
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत हिंगोली तालुक्यासाठी असलेल्या बालभवन विज्ञान केंद्राची ओळख जवळपासच्या इतर जिल्ह्यातही निर्माण झाली आहे. केंद्र स्थापनेपासून आतापर्यंत वीस हजार विद्यार्थ्यांनी बालभवनाची भेट घेऊन रंजनात्मक पद्धतीने विज्ञानाचे धडे घेतले आहेत. येथील कार्यप्रर्वतक नितिन मोरे हे विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख साध्या व सोप्या पद्धतीने करून देतात. या नियोजनबद्ध विज्ञानाची माहिती व मार्गदर्शन केले जात असल्याने हिंगोली येथील बालभवनास जवळच्या जिल्ह्यातील शाळांना भेट देण्यास येत आहेत. प्राचार्य सुभाष अंभोरे यांनी प्रत्येक्ष भेट देऊन त्यानंतर विद्यार्थ्यांन ते थेट हिंगोली येथील बालभवनात घेऊन आले. सकाळी ११ ते ५ यावेळेत विद्यार्थ्यांना रंजनात्मक पद्धतीने खेळ व कृतीतून मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षक टी. सी. चौधरी, के. के. भालेराव, यू.एन. मनसरे, व्ही. एम. पºहाते, विज्ञान शिक्षक वर्षा मापारी, एन.एन. रिठ्ठे, अमोल गोटे हजर होते.