बळीराजा संपावर
By Admin | Published: June 2, 2017 12:11 AM2017-06-02T00:11:34+5:302017-06-02T00:19:35+5:30
बीड : जिल्हाभरात कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारून मोर्चे, ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हाभरात कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारून मोर्चे, ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध केला. बीडमध्ये शेतकरी क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शेतकरी एकवटले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चाला सुरूवात झाली. लक्षवेधी घोषणांमुळे शहर दणाणून गेले होते.
शहरातील विविध मार्गावरून मोर्चा निघून दुपारी साडेबारा वाजत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. शासनाच्या उदासिन व कुचकामी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे यावेळी शेतकरी आंदोलकांनी सांगितले. निवेदनावर कुलदीप करपे, प्रा. सुशीला मोराळे, नीलेश मोहिते, राजू गायके, धनंजय मुळे, राजेश कदम, बी.डी.लोणकर, पंजाब काकडे, कालीदास आपेट, परमेश्वर पिस्तुरे, गंगाभिषण धावरे, राजाभाऊ देशमुख, संभाजी होके, आनंद आखाडे, प्रवीण खोडसे, बी.एस. पठाण, मच्छिंद्र गावडे, मनोज शेंबडे, डॉ. उद्धव घोडके, इकबाल पेंटर, आनंद भालेकर, मधुकर पांडे, राजेंद्र आमटे, दत्ता जाधव आदींची नावे आहेत.