पळशी परिसरात बळीराजा लागला खरिपाच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:12+5:302021-05-22T04:05:12+5:30

पळशी, उपळी, मांडगाव, लोणवाडी, म्हसला, खातखेडा, केऱ्हाळा आदी भागातील शेतकरी जोमाने खरिपाच्या तयारीला लागले आहेत. सध्या शेतजमीन नांगरणीचा हंगाम ...

Baliraja started preparing for kharif in Palashi area | पळशी परिसरात बळीराजा लागला खरिपाच्या तयारीला

पळशी परिसरात बळीराजा लागला खरिपाच्या तयारीला

googlenewsNext

पळशी, उपळी, मांडगाव, लोणवाडी, म्हसला, खातखेडा, केऱ्हाळा आदी भागातील शेतकरी जोमाने खरिपाच्या तयारीला लागले आहेत. सध्या शेतजमीन नांगरणीचा हंगाम सुरू आहे. तसेच शेतामध्ये शेणखत टाकण्याची लगबग सध्या सुरू आहे. कडक नियमांमुळे शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांतून शेणखत विकत आणण्याला अडचणी येत आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे कामधंदे बंद असल्यामुळे आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकऱ्यांना आता खरी चिंता बी-बियाणे व खतांच्या खरेदीची लागली आहे. आतापासूनच पीककर्जासाठी बँकेत रांगा लागत असल्याचे दिसत आहे. खरीप हंगाम काही दिवसांवर असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते वेळेत उपलब्ध होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, तसेच शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे देण्यास दुकानदार टाळाटाळ करीत असेल किंवा चढ्या दराने विक्री करीत असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी केले आहे.

Web Title: Baliraja started preparing for kharif in Palashi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.