शाळा, मैदाने खाजगी संस्थांना देण्याचा चेंडू आता पालकमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:07 AM2021-01-08T04:07:02+5:302021-01-08T04:07:02+5:30

औरंगाबाद : महापालिकेने उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी महापालिकेच्या मालकीच्या ७ शाळा, ५ ...

The ball to give schools, grounds to private institutions is now in the court of the Guardian Minister | शाळा, मैदाने खाजगी संस्थांना देण्याचा चेंडू आता पालकमंत्र्यांच्या कोर्टात

शाळा, मैदाने खाजगी संस्थांना देण्याचा चेंडू आता पालकमंत्र्यांच्या कोर्टात

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेने उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी महापालिकेच्या मालकीच्या ७ शाळा, ५ खेळांची मैदाने खाजगी संस्थांना देण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही तर सिडकोकडून प्राप्त झालेले भूखंड खाजगी संस्थांना भाडेकरारावर देण्याचा दुसरा ठराव मंजूर केला. या प्रक्रियेला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ब्रेक लावला. आता मनपा प्रशासन पालकमंत्र्यांसमोर पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देणार आहे. त्यानंतरही पालकमंत्र्यांनी खाजगीकरणास नकार दिला तर ठराव रद्द करण्यात येईल असे प्रशासक पांडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे बंद पडलेल्या शाळांच्या इमारत दुरुस्तीवर खर्च करता येत नाही. बंद पडलेल्या ७ शाळा आणि आरक्षित ५ भूखंड शिक्षण संस्थांना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्वावर देण्यासाठी पीएमसीची नियुक्ती करुन निविदा मागवण्याचा ठराव मनपा प्रशासनाने डिसेंबर अखेरीस घेतला. तसेच सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरित झालेले खेळांच्या मैदानांवर खेळाडूंच्या सरावासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता धोरण निश्चित करण्यात येईल. याकरिता ईओआय (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट)मागवून निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हे दोन्ही ठराव २१ डिसेंबर २०२० रोजी विषय क्रमांक ७० व विषय क्रमांक ७३ नुसार घेतले आहेत. हे ठराव घेतल्यानंतर प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय हे दहा दिवसाच्या सुटीवर गेले. लोकमतने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतली. दोन्ही ठराव जशास तसे ठेवण्याचे आदेश प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले. त्यानुसार दोन्ही ठराव स्थगित ठेवण्यात आले आहेत. दरम्यान या गंभीर प्रश्नावर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी आपली भूमिका मांडली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेच्या शाळांसह खेळांची मैदाने विकासकांना देण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन्ही ठरावांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी पालकमंत्री देसाई यांच्यासमोर दोन्ही ठरावांचे सविस्तर सादरीकरण करुन मनपाची भूमिका मांडण्यात येईल. पालकमंत्र्यांनी अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली तरच पुढील कार्यवाही करण्यात येईल. अन्यथा दोन्ही ठराव रद्द करण्यात येतील असेही पांडेय यांनी सांगितले.

मनपाच्या बंद पडलेल्या शाळा

गीतानगर मनपा शाळा- एन-९ सिडको मनपा शाळा, एन-११ हडको मनपा शाळा, हर्षनगर मनपा शाळा, मोतीकारंजा मनपा शाळा, मॉडेल मिडल स्कूल, गांधीनगर मनपा शाळा, रेल्वेस्टेशन-चेलीपुरा मनपा शाळा.

शाळांसाठी आरक्षित पाच भूखंड

मनपाने विविध ठिकाणी संपादित केलेल्या शालेय आरक्षणातील भूखंड पीपीपी तत्वावर दिले जाणार आहेत. त्यामध्ये गारखेडा न.भू.क्र.७३५/१/पैकी क्षेत्रफळ ३६०० चौ. मी. (आरक्षण क्र. २७३), हर्सुल न.भू.क्र १७२/११, क्षेत्रफळ १८२ चौ.मी. (पी.एस.-३), कांचनवाडी गट क्र ४७/३ क्षेत्रफळ ४४५० चौ.मी. (पी.एस.-४), नक्षत्रवाडी गट क्र. १०२ पैकी क्षेत्रफळ ८८०४.४० चौ.मी. (आरक्षण क्र. १), गारखेडा सर्व्हे. नं.५१/१, (शालेय आरक्षण)

Web Title: The ball to give schools, grounds to private institutions is now in the court of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.