हवेत उडणाऱ्या सापामुळे भंबेरी
By Admin | Published: February 4, 2017 12:31 AM2017-02-04T00:31:30+5:302017-02-04T00:35:12+5:30
बीड : शहरातील बार्शी रोडवरील एका खासगी प्रतिष्ठानमध्ये शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हवेत उडणारा दुर्मिळ रुखई साप आढळून आला.
बीड : शहरातील बार्शी रोडवरील एका खासगी प्रतिष्ठानमध्ये शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हवेत उडणारा दुर्मिळ रुखई साप आढळून आला. त्यामुळे उपस्थितांची भंबेरी उडाली.
प्रतिष्ठानमध्ये काही कर्मचारी काम करीत होते. तेव्हा गवतामधून सरपटत आलेल्या सापाने वाळलेल्या झाडावर झेप घेतली. त्यानंतर सर्पमित्र अमित भगत यांना पाचारण करण्यात आले. स्टीकद्वारे त्यांनी तो पकडला. यावेळी त्याने भगत यांच्या बोटाला चावाही घेतला. बिनविषारी असलेल्या या सापाची लांबी चार ते पाच फूट होती. तपकिरी रंगाच्या रेषा, फिकट पिवळा व सडपातळ बांधा असलेला हा सर्प दक्षिणेकडील राज्यांमध्ये आढळून येतो. सर्पमित्र भगत यांनी हा साप पालीजवळील जंगलात सोडला. (प्रतिनिधी)