सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प

By Admin | Published: March 15, 2016 12:52 AM2016-03-15T00:52:04+5:302016-03-15T01:02:19+5:30

श्रीनिवास भोसले , नांदेड सोन्यावरील अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी सराफा व्यापारी आणि सुवर्णकारांनी पुकारलेल्या बंदमुळे नांदेड सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे़

The ban on multi-billionaire jewelery in the bullion market | सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प

सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प

googlenewsNext


श्रीनिवास भोसले , नांदेड
सोन्यावरील अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी सराफा व्यापारी आणि सुवर्णकारांनी पुकारलेल्या बंदमुळे नांदेड सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे़ गत चौदा दिवसांत अंदाजे ३० ते ३५ कोटी रूपयांची उलाढाल थांबल्याने व्यापाऱ्यांना लाखो रूपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले़
जिल्ह्यात जवळपास सोन्या-चांदीची १४०० दुकाने असून यातील २७० दुकाने नांदेड शहरात आहेत़ याठिकाणी काम करणाऱ्या सुवर्णकार आणि कारागिरांची संख्या साडेचार हजारांच्या घरात आहे़ अबकारी कराच्या विरोधात सुरू असलेल्या बंदमुळे या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे़ १९६२ ते १९९२ या कालावधीत अबकारी कराच्या जाचक अटीमुळे अशिक्षित सुवर्णकार अडचणीत सापडला होता़ याच कालावधीत अनेक सुवर्णकारांनी आपली दुकाने बंद करून मिळेल ती नोकरी करणे पसंद केले़ तर या तीस वर्षांच्या कालावधीत १०९ सुवर्णकारांनी आत्महत्या केली होती़ दरम्यान, १९९२ मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला़ मात्र, भाजपा सरकारने पुन्हा तो कायदा आणल्याने त्या घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सचिव सुधाकर टाक यांनी केला़ इंदौर आणि सोनपेठ येथे शासनाच्या धोरणाला कंटाळून दोन सुवर्णकारांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले़
देशातील सोन्या-चांदीच्या मल्टीनॅशनल शोरूम आणि कंपन्यांमध्ये अनेक मंत्र्यांची भागिदारी असून ते शोरूम चालले पाहिजेत म्हणून सुवर्णकारांना वेठीस धरण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे़ अबकारी करातील जाचक अटींना कंटाळून अशिक्षित सुवर्णकारांनी आपले दुकान बंद करावीत, असा शासनाचा हेतू असल्याचा आरोप सुधाकर टाक यांनी केला़
४नवीन कायद्यानुसार सुवर्णकारांना दागिना घडविण्यासाठी सोने आखणी कारखाना, दागिन्यासाठी टिकल्या पाडण्याच्या ठिकाणी, दागिना बनविण्याच्या ठिकाणी, पॉलिश करण्याच्या ठिकाणी आणि फिनिशिंग करताना अशा अनेक ठिकाणी सोन्याच्या वजनाच्या नोंदी कराव्या लागणार आहेत़ यातून कुठे नोंद चुकली तर त्यांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि आर्थिक दंड होणार आहे़

Web Title: The ban on multi-billionaire jewelery in the bullion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.