बँक कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल

By Admin | Published: November 12, 2014 12:04 AM2014-11-12T00:04:17+5:302014-11-12T00:26:48+5:30

बीड : भारतीय स्टेट बँकेच्या धारूर शाखेतील कर्मचाऱ्याला रविवारी मारहाण झाली होती़ या प्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने पोलिसांवर दबाव आणल्यानंतर सोमवारी उशिराने

Bank employees file complaint due to pressure | बँक कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल

बँक कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल

googlenewsNext


बीड : भारतीय स्टेट बँकेच्या धारूर शाखेतील कर्मचाऱ्याला रविवारी मारहाण झाली होती़ या प्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने पोलिसांवर दबाव आणल्यानंतर सोमवारी उशिराने धारूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी देखील येथील शाखा बंद ठेवण्यात आली होती़ येथील व्यापारी, ग्राहकांची गैरसोय झाल्याचे दिवसभर पहावयास मिळाले़
भारतीय स्टेट बँकेचे रविवारी आॅडिट सुरू होते़ दुपारच्या वेळी आठ ते नऊ जणांनी बँक कर्मचारी नितेश प्रभाकर धोटे यांना बेदम मारहाण केली़ गौतम चव्हाण, विकी चव्हाण व नाना चव्हाण अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून इतर चार जणांचा पोलीस तपास करीत आहेत़ मारहाण झाल्यानंतर कर्मचारी फिर्याद देण्यासाठी धारूर पोलिस ठाण्यात गेले़ तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती मुख्य प्रबंधक सुनील चिटणीस यांनी दिली़
दोषींवरकारवाई झाली पाहिजे
बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले होत राहिले तर कर्मचारी काम करणार नाहीत़ धारूर येथे बँक कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला विनाकारण झालेला आहे़ याप्रकरणात जे दोषी असतील त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असे बँक अधिकारी विलास कांबळे, जगदीश दासखेडकर, राम खरटमल यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)४
रविवारी घटना घडल्यानंतर बँक अधिकारी संघटनेने अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेवून सर्व परिस्थिती सांगितली़ त्यानंतर यंत्रणा तात्काळ हलल्याचे बँक कर्मचारी संघटनेचे जगदीश दासखेडकर व राम खरटमल यांनी सांगितले़ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर मंगळवारी देखील धारूर शाखा बंद राहिल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़

Web Title: Bank employees file complaint due to pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.