चार दिवसांनंतर आज उघडणार बँका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:02 AM2021-03-17T04:02:12+5:302021-03-17T04:02:12+5:30

औरंगाबाद : बँकांच्या खासगीकरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या संपात दुसऱ्या दिवशी मंगळवारीही बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शनिवारी, रविवार सुटी ...

Banks to open today after four days | चार दिवसांनंतर आज उघडणार बँका

चार दिवसांनंतर आज उघडणार बँका

googlenewsNext

औरंगाबाद : बँकांच्या खासगीकरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या संपात दुसऱ्या दिवशी मंगळवारीही बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शनिवारी, रविवार सुटी आणि सोमवार, मंगळवारी संप, अशा चार दिवसांनंतर आता बुधवारी बँका उघडणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे १५ आणि १६ मार्च रोजी संप पाळला. शहरातील विविध बँकांसमोर कर्मचारी-अधिकाऱ्यांनी नागरिकांना सार्वजनिक बँकांचे खासगीकरण झाल्यास काय परिणाम होईल, यासंदर्भात माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप केले. दोन दिवसांत दहा हजार पत्रकांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.

ऑनलाइन व्यवहार, पण चेक पडून

चार दिवस बँका बंद राहिल्याने नागरिकांनी आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्यावर भर दिला. परंतु जे व्यवहार चेकनेच होतात, ते मात्र ठप्प राहिले. बँकांच्या एटीएममधील बाॅक्समध्ये चेक पडून आहेत. असे चेक आता बुधवारपासूनच क्लिअरिंगला जातील. संपाच्या दोन दिवसांत कोट्यवधींचे बँक व्यवहार ठप्प राहिले.

थकीत कर्जदारांना हवी निवडणूक लढविण्यास बंदी

संघटनांनी बँकिंग उद्योगातील कामकाजात अनेक सुधारणा सुचविल्या आहेत. ज्या अमलात आणल्या तर बँकिंग उद्योग नफ्यात येईल. सामान्य माणसाच्या हिताचे रक्षणदेखील त्यातून होईल. थकीत कर्जदारांची यादी जाहीर करणे, हेतुपूर्वक कर्ज थकीत केेले तर तो गुन्हा ठरविणे, थकीत कर्जदारांना निवडणूक लढविण्यास बंदी, आदी बाबी सुचविल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने दिली.

Web Title: Banks to open today after four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.