बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे ३८ जण सैन्यात

By Admin | Published: May 27, 2016 11:14 PM2016-05-27T23:14:33+5:302016-05-27T23:27:13+5:30

औरंगाबाद : बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून ३८ जवान गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाल्याचे उघड झाले आहे.

Based on fake certificates, 38 people | बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे ३८ जण सैन्यात

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे ३८ जण सैन्यात

googlenewsNext

औरंगाबाद : बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून ३८ जवान गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी या जवानांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल यादव, रोहन नाले, अक्षय गोसावी, विकास भोपाले, उमेश ढंगाळे (सर्व रा. कोल्हापूर) आदी ३८ जवानांचा यात समावेश आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती होणाऱ्यांविरोधात मोठ्या संख्येने गुन्हा दाखल होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सैन्यदलातर्फे औरंगाबादेत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हजारो तरुण सहभागी झाले होते. निकष पूर्ण करणाऱ्यांना सैन्यदलात भरती करण्यात आले.
त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची छावणीतील सैन्य भरती अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यावेळी सुमारे ३८ जवानांचे शैक्षणिक कागदपत्रे पश्चिम महाराष्ट्रातील तर त्यांनी सादर केलेले रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला औरंगाबाद तहसील कार्यालय, वैजापूर, धुळे, चाळीसगाव आणि साक्री तहसील कार्यालय इ. ठिकाणांहून काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. या जवानांच्या कागदपत्रांच्या

सत्यतेविषयी सैन्य भरती अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी फेब्रुवारी महिन्यात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला. पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपविले. पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन महिने गुप्त चौकशी केली. या चौकशीत सैन्य भरती अधिकाऱ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. या प्रकरणी कर्नल मोहनपाल सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
बनावट सही, शिक्का वापरून तयार केले बनावट प्रमाणपत्र
मूळचे सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ११ जवानांनी वैजापूर तहसील कार्यालयाचे तर ११ जवानांनी औरंगाबाद तहसील कार्यालयातून रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला काढलाच नसल्याचे समोर आले. त्यांनी बनावट शिक्का तयार करून त्यावर सक्षम अधिकाऱ्याची बनावट सही मारून बनविलेले नकली प्रमाणपत्र सैन्य दलास सादर केले. तर २ जणांनी जळगाव तहसीलचे तर तीन जणांनी धुळे, साक्री तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर केले. शिवाय एका जणाने चाळीसगाव तहसीलचे बनावट प्रमाणपत्र तयार केले.
रेल्वेंच्या बोगीत वाढ
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात विविध रेल्वेगाड्यांच्या आरक्षित बोगी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेसला ५ ते २९ जून, सिकंदराबाद-शिर्डी-सिंकदराबाद रेल्वेला ३ ते २५ जून तर नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसला १ जून ते १ जुलैदरम्यान प्रत्येकी एक बोगी वाढविण्यात येणार आहे.

Web Title: Based on fake certificates, 38 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.