अन् रद्दी म्हणून नेले नव्या संचिकांचेच गठ्ठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:25 AM2017-11-02T00:25:48+5:302017-11-02T00:25:56+5:30
जिल्हा परिषदेत सध्या सहा गठ्ठे कार्यक्रमांतर्गंत अ, ब, क, ड असे संचिकांचे वर्गीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात महत्त्वाच्या व जास्त काळ सांभाळून ठेवायच्या संचिका वेगळ्या काढून इतर कालबाह्य संचिका रद्दीत काढल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेत सध्या सहा गठ्ठे कार्यक्रमांतर्गंत अ, ब, क, ड असे संचिकांचे वर्गीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात महत्त्वाच्या व जास्त काळ सांभाळून ठेवायच्या संचिका वेगळ्या काढून इतर कालबाह्य संचिका रद्दीत काढल्या जात आहेत. मात्र रद्दी समजून चार नव्याच संचिका काहींनी नेल्या. मात्र त्या परत आणून दिल्याने पाचावर धारण बसलेल्या अर्थ विभागाच्या अधिकाºयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हिंगोली जिल्हा परिषदेत सध्या प्रत्येक विभागात संचिकांची तपासणी सुरू आहे. यात जि.प. स्थापनेपासूनच्या संचिका काढून त्यातील महत्त्वाच्या संचिका अद्ययावत करून ठेवल्या जात आहेत. त्यातील कागदपत्रे सुस्थितीत राहण्यासाठी गठ्ठ्याला प्लास्टिकचे आवरण टाकले जात आहे. ते कापडात बांधून त्यावर संचिकेचे नाव, वर्षे आदी बाबी टाकल्या जात आहेत. या कामात सगळेच विभाग व्यस्त आहेत. प्रत्येक कार्यालयात संचिकांचा पसारा पडलेला दिसत आहे. शेकडो किलो रद्दीही काढली जात आहे. अशाच एका सफाई कामगाराने रद्दी पस्रपर उचलली अन् प्रशासनाची धांदल उडाली. या संचिका गायबच कशा झाल्या, याचा शोेध सुरू झाला होता. त्यानंतर सकाळच्या सत्रात काही खाजगी लोक सफाईला येतात. त्यांनीही काही रद्दी नेल्याचे चौकशीअंती कळाले. सुरुवातीला त्यानेही रद्दीच समजून नीट सांगितले नाही. मात्र नंतर गुन्हा दाखल करण्याचा बडगा दाखविताच संबंधिताने संचिका आणून दिल्या.