अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये वर्चस्वाची लढाई

By Admin | Published: February 6, 2017 02:59 PM2017-02-06T14:59:04+5:302017-02-06T14:59:04+5:30

सिल्लोड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Battle of Varchasava in Abdul Sattar and Raosaheb Danavan | अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये वर्चस्वाची लढाई

अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये वर्चस्वाची लढाई

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत/ श्यामकुमार पुरे

औरंगाबाद, दि. 6 - सिल्लोड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे राजकारणातील एक मुरब्बी नेते म्हणून ओळखले जातात. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व आ. सत्तार यांची  मैत्री सर्व परिचित आहे. यामुळे विधानसभा,  कृषी उत्प्नन बाजार समिती व तालुक्यातील विविध सहकारक्षेत्रावर काँग्रेसने बाजी मारली. मात्र या आगामी निवडणुकीत दोस्ती बाजूला ठेवून दोन्ही नेते वर्चस्वाची लढाई लढताना दिसत आहे. यामुळे दोस्त ...दोस्त ...ना रहा.....असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
आता या वर्चस्वाच्या लढाईत कोण कुणाला चकवा देतो... हे निवडणुकीच्या निकालात स्पष्ठ होईल.  आगामी निवडणुका जाहीर झाल्यावर सिल्लोड तालुक्यात दानवे व सत्तार यांच्यात विकास कामाच्या उद्घाटन करण्यावरुन कलगीतुरा रंगला होता. विकास काम आम्हीच मंजूर केल्याचे दोन्ही नेते सांगत होते. आता उद्धघाटन सत्र संपले. सत्तार यांनी दानवे यांच्यावर गुन्हे दाखल करा इथंपर्यंत टीका केली. मात्र दानवे यांनी जाहीर सभेत सत्तार यांच्याविरोधात एक शब्द ही बोलले नाहीत.
मात्र आता प्रचार सभेत हे नेते काय करतात हे दिसेलच. काही दिवसासाठी का होईना मैत्री बाजूला ठेवून हे दोन्ही नेते जि.प.प.स. ताब्यात घेण्यासाठी वर्चस्वाची लढाई लढताना दिसत आहे.
 
ही  निवडणूक जिंकायचीच असा निश्चय दोन्ही नेत्यांनी केलेला आहे. यानिमित्त दानवे यांनी तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर कोणत्याही परिस्थित आपले वर्चस्व कमी होणार नाही याची खबरदारी आ. सत्तार यांनी घेतली आहे. सिल्लोड तालुक्यांतील आठ ही जि.प. गट व सोळा पंचायत समिती गणात आपल्याच पक्षाचे  उमेदवार निवडून यावे याकरिता कंबर कसली आहे.
 
भाजपचा गढ ताब्यात घेतला 
सिल्लोड तालुका भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आ. सत्तार यांनी भाजपाच्या किल्ल्याला सुरंग लावत भाजपाचे उमेदवार सुरेश पा बनकर यांचा तब्बल तीस हजारांच्या मताने पराभव करुण तालुक्यात आपले बस्तान मांडले. पुन्हा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अख्या भारतात मोदी लाट असतानाही बनकर यांचा सोळा हजारांच्या मताने पराभव करुण तालुक्यात आपले वर्चस्व निर्माण करुण भाजपाचे गढ ताब्यात घेतले. तेव्हा पासून भाजपाचे प्रत्येक निवडणुकीत पतन होत आहे.
 
मागच्या चुकांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी भाजप दक्ष 
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि.प.प.स.च्या निवडणुकीला पाहिले जात आहे. यामुळे मागच्या चुकांची पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार नाही याची दक्षता भाजपाच्या पुढाऱ्यांनी घेतली आहे. स्व:ता भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपली पूर्ण ताकद सिल्लोड - सोयगाव  तालुक्यात लावली आहे. व कोणत्याही परिस्थित भाजपाचा ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घ्यायचा यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यासाठी भाजपाचे सुरेश बनकर,  माजी.आ. सांडु पाटील लोखंडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, इदरीस मुलतानी, राजेन्द्र जैस्वाल, राजेन्द्र ठोंबरे यांसहीत गटबाजी करणारे सर्वच नेते कामाला लागले आहे.
 
आ. सत्तार यांची फिल्डिंग 
सिल्लोड- सोयगाव तालुक्यात असलेले वर्चस्व संपु द्यायचे नाही.पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीवर कॉंग्रेस चा झेंडा फड़कावा यासाठी  आ.अब्दुल  सत्तार, माजी जि.प.अध्यक्ष प्रभाकर पालोदकर  यांनी नियोजन बद्ध फील्डिंग लावली आहे. सहकार क्षेत्राचा तगड़ा अनुभव, तगड़ा जनसम्पर्क, नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा...साम दाम दंड भेद सर्व अस्र वापरून निवडणूक मैदानात उतरले आहे.
 
कोण कुणाला देतो चकवा...
आ सत्तार यांनी तालुक्यातिल गट व गणात प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक सभेमध्ये ते भाजपा सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढ़वित आहे. तर भाजपातर्फे सरकारच्या विविध योजना, नोटाबंदी फायदे जनतेला पटवून दिले जात आहे.यामुळेया निवडणुकीत खा. दानवे हे सत्तारांना चकवा देतात की  सत्तार दानवेंना ....हे थोड्याच दिवसात समजेल.
 
8 गटातील पक्षणिहाय परिस्थिती  
तालुक्यातील मागील पंच वार्षिक मध्ये आठ गटा पैकी  4 गटात कॉंग्रेस चे वर्चस्व होते. तर भाजपा 02, मनसे 01,राष्ट्रवादी 01 असे एकूण आठ जि. प. गटात कॉंग्रेस चे वर्चस्व होते. आता हे वर्चस्व टिकवुन जागा वाढवण्याचे आव्हान कॉंग्रेस समोर आहे. तर संपूर्ण गट ताब्यात घेण्यासाठी भाजपाने रणनीती तैयार केली आहे.
 
मागील पंच वार्षिक मध्ये तालुक्यातील सोळा गणांपैकी कॉंग्रेसच्या ताब्यात  06, भाजपा 06, शिवसेना 01, अपक्ष 01,राष्ट्रवादी 02 गण होते. कुणालाही स्पष्ठ बहुमत नव्हते.

Web Title: Battle of Varchasava in Abdul Sattar and Raosaheb Danavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.