सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:41 PM2021-07-22T12:41:24+5:302021-07-22T12:42:01+5:30

Corona Virus in Aurangabad : तिसरी लाट भयंकर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

Be careful! 4 lakh citizens in danger of being affected in the third wave of Corona | सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका

सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका

googlenewsNext
ठळक मुद्देऑगस्ट अखेरपासून रुग्ण वाढण्याची शक्यता

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अखेर येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोना आणि लसीकरणामुळे ८ लाख नागरिकांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तयार झाल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका आहे. ऑगस्ट अखेरपासून रुग्ण वाढतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ( 4 lakh citizens in danger of being affected in the third wave of Corona in Aurangabad ) 

देशातील २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांत चौथा राष्ट्रीय सेरो सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार देशातील सुमारे ४० कोटी नागरिकांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी महिनाभरापूर्वीच याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. शहरात किमान ५ लाख नागरिक बाधित होतील, असा त्यांचा अंदाज होता. आता सेरो सर्वेक्षणातून हा आकडा ४ लाखांपर्यंत आला आहे. पाण्डेय यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेत सुमारे १ लाख ४ हजार नागरिक बाधित झाले होते. तिसरी लाट भयंकर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

शहराची २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या साधारणपणे १२ लाख इतकी आहे. त्यामध्ये दहा वर्षात अंदाजे ३ ते ५ लाख वाढ झालेली असून १७ लाख इतकी लोकसंख्या गृहीत धरली जाते. आतापर्यंत ५ लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना होऊन गेल्यामुळे अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेले नागरिक सुमारे अडीच लाख आहेत. त्यामुळे सुमारे ८ लाख नागरिकांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेल्यांना कोरोना संसर्गाची शक्यता कमी आहे. शहरात राहत असले तरी ग्रामीण भागात लसीकरण करणारे साधारण एक ते दीड लाख नागरिक आहेत. त्यामुळे उर्वरित ४ लाख नागरिकांना तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याचा धोका आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Be careful! 4 lakh citizens in danger of being affected in the third wave of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.