काळजी घ्या ! औरंगाबाद शहरात दोन दिवसात वाढले २१५ कोरोना रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:14 PM2021-02-18T14:14:24+5:302021-02-18T14:16:02+5:30

corona virus in Aurangabad औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी १२० तर बुधवारी १३७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे

Be careful! In the city of Aurangabad, the number of corona patients increased by 215 in two days | काळजी घ्या ! औरंगाबाद शहरात दोन दिवसात वाढले २१५ कोरोना रुग्ण 

काळजी घ्या ! औरंगाबाद शहरात दोन दिवसात वाढले २१५ कोरोना रुग्ण 

googlenewsNext
ठळक मुद्दे सध्या जिल्ह्यात ४९८ रुग्णांवर सुरू उपचार आहेततब्बल साडेतीन महिन्यांनंतर जिल्ह्यात रुग्णांचा तिहेरी आकडा

औरंगाबाद : औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १३७ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील रुग्णांची सर्वाधिक आहे, तर एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहरात मंगळवारी ९६ तर बुधवारी ११९ असे दोन दिवसात एकूण २१५ रुग्ण वाढले आहेत. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर जिल्ह्यात रुग्णांचा तिहेरी आकडा झाल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.    

जिल्ह्यात सध्या ४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ४७ हजार ९७९ झाली आहे. यात आतापर्यंत ४६ हजार २३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३७ रुग्णांत मनपा हद्दीतील ११९, ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४० आणि ग्रामीण भागातील ५, अशा एकूण ४५ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. संजयनगरातील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला

मनपा हद्दीतील रूग्ण -११९
मोरेश्वर हा.सो. १, चेतक घोडा परिसर १, आकाशवाणी परिसर, मित्र नगर १, शिवाजीनगर ३, तिरूपती एक्जीक्यूट १, एन नऊ सिडको १, चौधरी नगर १, एन नऊ हडको १, एन सहा अविष्कार कॉलनी ३, एन वन सिडको ३, दशमेश नगर १, संग्रामनगर १, एन सात सिडको २, नंदनवन कॉलनी २, सातारा परिसर ३, सिंधी कॉलनी ३, मुकुंदवाडी २, हायकोर्ट परिसर १, एन चार सिडको ४, चिकलठाणा १, बन्सीलालनगर २, अजबनगर १, राजे संभाजी कॉलनी २, एन पाच सिडको १, इटखेडा १, सूतगिरणी परिसर १, घाटी परिसर २, बीड बायपास ४, सूदर्शननगर, हडको १ द्वारकानगर १, पटेलनगर १, एन बारा हडको १, क्रांती चौक १, व्यंकटेश नगर १, स्काय सिटी बीड बायपास १, उस्मानपुरा ३, ज्योतीनगर १, साई श्रद्धा नक्षत्रवाडी १, सुराणानगर १, मिल कॉर्नर, नवीन पोलीस कॉलनी परिसर १, छत्रपतीनगर, बीड बायपास २, अन्य ५३

ग्रामीण भागातील रूग्ण- १८
पैठण १, सराफा बाजार सिल्लोड १, वाळूज रेल्वे स्टेशन कॅम्प १, साईनगर सो., हिरापूर २, सलामपूर, वडगाव १, बजाजनगर २, नागद, कन्नड १, वीरगाव, वैजापूर १, सावंगी, लासूर स्टेशन १, वैजापूर १, फुलंब्री १, अन्य ५

Web Title: Be careful! In the city of Aurangabad, the number of corona patients increased by 215 in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.