वाहनधारकांनो दुसऱ्यांच्या अंगावर पाणी, चिखल उडवाल तर खबरदार ! होईल गुन्हा दाखल

By राम शिनगारे | Published: July 20, 2023 12:52 PM2023-07-20T12:52:25+5:302023-07-20T12:52:43+5:30

प्रत्येक वाहनाच्या चाकांच्या पाठीमागील भागात मड फ्लॅप बसविणे बंधनकारक आहे.

Be careful if drivers throw water and mud on others! A case will be filed | वाहनधारकांनो दुसऱ्यांच्या अंगावर पाणी, चिखल उडवाल तर खबरदार ! होईल गुन्हा दाखल

वाहनधारकांनो दुसऱ्यांच्या अंगावर पाणी, चिखल उडवाल तर खबरदार ! होईल गुन्हा दाखल

googlenewsNext

- शेख मुनीर
छत्रपती संभाजीनगर :
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडलेले असल्यामुळे त्यात पाणी साचते. हेच पाणी रस्त्याने चालत जाणाऱ्यांच्या अंगावर आलिशान गाड्यांमधून फिरणारे उडवतात. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, त्याविषयी गाडीवाल्यांना काहीही वाटत नाही. असा प्रकार करणाऱ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्यामुळे असा प्रकार करण्यापूर्वी अनेकवेळा विचार करा अन् मगच कृती करा, असा इशाराच शहर पोलिसांनी दिला आहे.

प्रत्येक वाहनाला ‘मड फ्लॅप’ बंधनकारक
प्रत्येक वाहनाच्या चाकांच्या पाठीमागील भागात मड फ्लॅप बसविणे बंधनकारक आहे. हे मड फ्लॅप बसविल्यामुळे वाहनाच्या टायरमुळे पाणी रस्त्याने चालत जाणाऱ्यांच्या अंगावर उडत नाही. मड फ्लॅप बसविलेला नसेल तर वाहनामध्ये बदल केल्याच्या प्रकारात आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते.

तक्रारच येत नाही
रस्त्याने जाणाऱ्या वाहनाने अंगावर पाणी, चिखल उडविल्याची अद्यापपर्यंत तरी तक्रार आलेली नाही. कोणी जाणूनबुजून अंगावर पाणी उडविले असेल तर त्याच्यावर हेतूपूर्वक कारवाई करू शकतो. मात्र, रस्त्यावर पावसाळ्यात पूर्णपणे पाणी असतं. त्यामुळे कोणाच्या अंगावर पाणी उडाले तर त्यावर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली नसल्याची माहिती वाहतूक विभागाचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

नियमानुसार कारवाई 
पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आतापर्यंत तरी गाडीमुळे कोणाच्या अंगावर चिखल, पाणी उडविल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. तशा पद्धतीची तक्रार दाखल झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- राजश्री आडे, निरीक्षक, पुंडलिकनगर ठाणे

Web Title: Be careful if drivers throw water and mud on others! A case will be filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.