सावधान ! कोरोनानंतर फुप्फुसात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 02:12 PM2020-12-01T14:12:07+5:302020-12-01T14:12:21+5:30

हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांपेक्षाही फुप्फुसाच्या रक्तनलिकांमध्ये गाठ असलेल्या रुग्णांना अधिक धोका दिसतो.

Be careful! Risk of blood clots in the lungs after corona | सावधान ! कोरोनानंतर फुप्फुसात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका

सावधान ! कोरोनानंतर फुप्फुसात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका

googlenewsNext
ठळक मुद्दे. उपचार घेतलेल्या कोरोना याेद्धा डॉक्टरलाच या धोक्याला तोंड द्यावे लागले.

औरंगाबाद : कोरोनानंतर रुग्णांच्या फुप्फुसाच्या रक्तनलिकांमध्ये गाठ तयार होऊन मृत्यूचा धोका संभवतो. उपचार घेतलेल्या कोरोना याेद्धा डॉक्टरलाच या धोक्याला तोंड द्यावे लागले. या डॉक्टर रुग्णावर एमजीएम रुग्णालयात तब्बल ५ तासांची शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. राहुल चौधरी, डॉ. प्रशांत उदगिरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या उपचाराविषयी माहिती दिली. एका डॉक्टरला कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना एमजीएममध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्याची तयारी सुरू होती. तेव्हा स्वच्छतागृहात ते कोसळले. त्यांच्या फुप्फुसाच्या नसांमध्ये रक्ताची गाठ आढळून आली. 

बरे झालेले रुग्ण गंभीर
डॉ. प्रवीण सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाचे उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल होतात. हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांपेक्षाही फुप्फुसाच्या रक्तनलिकांमध्ये गाठ असलेल्या रुग्णांना अधिक धोका दिसतो. कारण त्यांच्या उपचारासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे वेळीच गाठीचे निदान होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Be careful! Risk of blood clots in the lungs after corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.