‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’

By Admin | Published: November 16, 2016 12:33 AM2016-11-16T00:33:56+5:302016-11-16T00:33:27+5:30

बीड :डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.

"Be Guided by the Commitment of Commitment" | ‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’

‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’

googlenewsNext

बीड : दूरदृष्टी ठेवून शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड शहराचा विकास करणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन विकासाच्या दिशेने ते जात आहेत. डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.
बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अमरसिंह पंडित, राकाँचे उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, माजी आमदार उषा दराडे, माजी आ. जनार्दन तुपे, रायुकाँचे शेख शफीक, नवीदुज्जमा, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, माजी नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, हेमा पिंपळे आदींची उपस्थिती होती. तटकरे बोलताना म्हणाले, बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडला. अशा स्थितीत बीड शहरात टँकर लावावे लागले नाही, याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्रात केवळ बीडमध्येच महिला बचतगटाची चळवळ सक्रिय आहे. महिलांना लघु उद्योगातून चालना देण्याचे काम डॉ. भारतभूषण क्षीरसागर व त्यांच्या टीमने आतापर्यंत केलेले आहे. सत्ताही उपभोगायचे साधन नाही. सत्तेत असताना सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजेत, ही पवारसाहेबांची शिकवण आहे. बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहराचा विकास करुन दाखविला आहे. येणाऱ्या काळात उर्वरित कामे देखील मार्गी लागतील, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरसिंह पंडित म्हणाले, शहरातील संघर्षशील नेतृत्व म्हणून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. शहरातील जनता डॉ. क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवते, असे सांगून त्यांनी बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
गेवराईकरांनो, सेवेची संधी द्या !
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गेवराईतही राकाँच्या प्रचाराचा नारळ फुटला. यानिमित्ताने शहरातून कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. तटकरे म्हणाले, सत्ता ही कोणा एकाची बांधिलकी नाही. जनतेची सेवा करण्याची ही एक संधी असते. ही संधी गेवराईकरांनी राकाँला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने सरकारसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न नेटाने लावून धरले. जनतेच्या सुखदु:खाची राकाँला जाणीव आहे. त्यामुळे मतदारांनी भावनेच्या आहारी न जाता विकासाची क्षमता असलेल्या राकाँ उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आ. अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पिसाळ, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, बप्पासाहेब मोटे, श्याम येवले, समाधान मस्के, शांतीलाल पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. अमरसिंह पंडित यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)

Web Title: "Be Guided by the Commitment of Commitment"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.