गुणवंत आहातच, आता कीर्तिवंत व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:58 AM2018-06-19T00:58:20+5:302018-06-19T00:59:32+5:30

दहावीची परीक्षा हा करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या टप्प्यावर तुम्ही उज्ज्वल यश मिळवले आहे. यातूनच तुम्ही गुणवंत आहात हे सिद्ध होते. आता इथून पुढे करिअरची योग्य निवड करून कीर्तिवंत व्हा, अशा शब्दांत उच्चशिक्षण, सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Be merciful, be proud now! | गुणवंत आहातच, आता कीर्तिवंत व्हा !

गुणवंत आहातच, आता कीर्तिवंत व्हा !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दहावीची परीक्षा हा करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या टप्प्यावर तुम्ही उज्ज्वल यश मिळवले आहे. यातूनच तुम्ही गुणवंत आहात हे सिद्ध होते. आता इथून पुढे करिअरची योग्य निवड करून कीर्तिवंत व्हा, अशा शब्दांत उच्चशिक्षण, सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दहावी परीक्षेत उत्तम गुणांनी पास झालेल्या गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी ‘लोकमत’ आणि रेझोनन्स स्टडी सेंटर, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गौरव गुणवंतांचा’ या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर रेझोनन्स स्टडी सेंटरचे अवलेश शर्मा, अनिल त्रिपाठी, मृदुला मीनाक्षी, अंकु र सैनी, भुपेश झा, सुधीर सोनी, फरहा शेख यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. देशपांडे म्हणाले की, अनेक थोर पुरुषांप्रमाणे तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करा तसेच करिअरच्या पारंपरिक वाटा चोखळण्यासोबतच एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचाही आवर्जून विचार करा.
आजकाल सहजपणे उपलब्ध असणाऱ्या मोबाईल, इंटरनेट या गोष्टींचा तुमच्या ज्ञानासाठी योग्य उपयोग करावा, असेही त्यांनी सुचविले.
यानंतर प्रा. अनिल त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत होणाºया क्षुल्लक चुका कशा टाळल्या जाऊ शकतात, याविषयी माहिती दिली आणि इथून पुढच्या करिअरमध्ये कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम संकल्पना समजून घ्या, असे सांगितले. फरहा शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.
‘लोकमत’ आणि रेझोनन्स स्टडी सेंटर आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमच्या पाल्याचे कौतुक तर झालेच; पण सोबतच योग्य मार्गदर्शनामुळे क रिअरकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. यावेळी गुणवंतांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रेझोनन्सचे आदित्य देशपांडे आणि शोएब मोहम्मद यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Be merciful, be proud now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.