‘नॅक’ च्या फेरमूल्यांकनासाठी सज्ज राहावे
By Admin | Published: April 22, 2016 12:42 AM2016-04-22T00:42:21+5:302016-04-22T00:54:50+5:30
औरंगाबाद : प्रत्येक प्राध्यापकाच्या सक्रिय सहभागातूनच आपण गुणवत्तेचे शिखर गाठू शकतो.
औरंगाबाद : प्रत्येक प्राध्यापकाच्या सक्रिय सहभागातूनच आपण गुणवत्तेचे शिखर गाठू शकतो. त्यामुळे यापुुढे ‘नॅक’च्या फेरमूल्यांकनासाठी प्राध्यापकांनी सज्ज राहावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘इंटरनल क्वॉलिटी अॅश्युरन्स सेल’ची बैठक महात्मा फुले सभागृहात बुधवारी सायंकाळी घेण्यात आली. ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस संबोधित करताना कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, नॅक मूल्यांकनाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आपण भक्कमपणे पूर्वतयारी केली पाहिजे. हे काम एक वेळचे नव्हे तर सातत्याने करावयाचे आहे. त्यासाठी आपणास नव्या कार्यसंस्कृतीची गरज आहे. आपण जगातील टॉप १०० विद्यापीठांत येऊ शकतो. निष्ठा, त्याग व समर्पण यामुळे आपण यशाचे श्रेष्ठ शिखर गाठू शकतो. नैतिक व प्रामाणिक दृष्टीने आपण कार्य केले तर अधिक गतीने यश हस्तगत करू शकतो. आपल्याला आंतरराष्ट्रीय रँकिंगची पूर्वतयारी करावयाची आहे. त्यासाठी नॅकच्या फेरमूल्यांकनासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक विभागाचा त्रैमासिक अहवाल तयार करावयाचा आहे. त्यासाठी सुनियोजित प्रणालीची गरज आहे. प्रत्येक विभागात आयक्वॅक स्थापन करून उत्कृष्ट कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या चर्चेत डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ.रत्नदीप देशमुख, प्रा.भालचंद्र वायकर यांनी सहभाग घेतला. डॉ. धनश्री महाजन यांनी आभार मानले.