हे सुरांनो़़़चंद्र व्हा़़़!
By Admin | Published: September 14, 2014 11:42 PM2014-09-14T23:42:20+5:302014-09-14T23:46:55+5:30
माजलगाव : हे सुरांना़़़चंद्र व्हा़़़़ या कुसूमाग्रजांच्या गीताची लयबध्द मांडणी करून पं़ हेमंत पेंडसे यांनी रविवारी उपस्थित हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले़
माजलगाव : हे सुरांना़़़चंद्र व्हा़़़़ या कुसूमाग्रजांच्या गीताची लयबध्द मांडणी करून पं़ हेमंत पेंडसे यांनी रविवारी उपस्थित हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले़
येथील रसिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या पं़ पलुसकर स्मृती समारोहाची सुरूवात पुणे येथील पं़ हेमंत पेंडसे यांच्या सदाबहार मैफिलीने करण्यात आली़ यावेळी त्यांनी विविध मैफिलीचा नजारा रसिकांपुढे मांडला़ पं़ सी़ आऱ व्यास निर्मित धन कोणी आणि त्यानंतरच्या बंदीशीने शास्त्रीय संगीताची आवड झालेल्या उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केले़
पुणे येथील डॉ़ राहुल देशपांडे यांची लता मंगेशकर यांच्यावर असणारी रचनाही हेमंत पेंडसे यांनी स्वरबद्ध केली़ ही रचना अशी निर्गुणाचे रूप, तुझे अथांग तानाव, माऊलीचा मोगरा की तुळशीचा भाव या सारख्या गीतांना रसिकांमधून भरभरून दाद मिळाली़ न्या़ भरणे, डी़ के़ देशमुख, मोहनराव सोळंके, अॅड़ एस़ आऱ शर्मा, अॅड़ शिलेगावकर, अॅड़ रत्नाकर चौकीदार, प्रभाकर साळेगावकर, सुरेश सानप, रंगनाथ सावंत, डॉ़ निळेकर, प्रणेश पोरे, अभिजीत बारटक्के, संजय कुलकर्णी, प्रशांत सानप उपस्थित होते़(वार्ताहर)