स्वत:च बना सावित्री, झाशीची राणी
By | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:48+5:302020-12-02T04:06:48+5:30
यावेळी चाकणकर म्हणाल्या की, महिलांनी आता निर्णयप्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी बोलले पाहिजे. समाज ...
यावेळी चाकणकर म्हणाल्या की, महिलांनी आता निर्णयप्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी बोलले पाहिजे. समाज काय म्हणेल, यापेक्षा मला काय वाटते आहे, याचा विचार प्रत्येक महिलेने करावा. समाजानेही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. डॉ. अवचार, डॉ. बोरीकर, मंगल खिंवसरा यांनीही महिलांशी संवाद साधला. देवगिरी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दर्शना गांधी, डॉ. पुष्पा जाधव, डॉ. संगीता जाधव, डॉ. रंजना, डॉ. सुलोचना जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.