विवाहितेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:05 AM2021-07-11T04:05:01+5:302021-07-11T04:05:01+5:30
--------------------------------------------------------- विवाहितेचा छळ आणि मारहाण औरंगाबाद: कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक ...
---------------------------------------------------------
विवाहितेचा छळ आणि मारहाण
औरंगाबाद: कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला मारहाण करणाऱ्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात ९ जुलै रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जानेवारी त महिन्यात आरोपींनी छळ केल्याचे तक्रारीत नमूद केले. शहारूख शेख, शेख मीरा माेहम्मद गौस, इमरान शेख आणि चार महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
--------------------------------
नकली ब्लेड विकणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा
औरंगाबाद: ब्रॅण्डेड कंपनीच्या बनावट ब्लेड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर सिटीचौक पोलिसांनी ९ जुलै रोजी कारवाई केली. आरोपीकडून १ लाख १७ हजार रुपये किमतीच्या नकली कटिंग ब्लेड जप्त केल्या. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी अनुप संभाजी कोलप यांनी सिटीचौक ठाण्यात आरोपी व्यापाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविला. मोहंमद ईरशाद इकबाल अहेमद अंबिका(३७, रा. नवाबपुरा), अफजल भाई अशी व्यापाऱ्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे तपास करीत आहेत.
---------------------------------------
आजारी पत्नीला मारहाण
औरंगाबाद : पक्षघाताच्या आजाराने बेडवर पडून असलेल्या पत्नीला दांड्याने मारहाण करून जखमी करणाऱ्या मद्यपी पतीविरोधात उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता नागसेननगरात घडली.
-------------------------------------