खाम नदीपात्राचे सौंदर्यीकरण; नदीच्या ७२ किमींचा प्रवास साकारतोय चित्ररुपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:21 PM2021-05-08T12:21:49+5:302021-05-08T12:28:43+5:30

Kham river basin : छावणीतील आयकर भवनच्यालगत खामनदी पात्रातील संरक्षण भिंतीवर खाम नदीचा प्रवास कलाकारांनी रेखाटला आहे.

Beautification of Kham river basin; The journey of 72 km of the river is pictured | खाम नदीपात्राचे सौंदर्यीकरण; नदीच्या ७२ किमींचा प्रवास साकारतोय चित्ररुपात

खाम नदीपात्राचे सौंदर्यीकरण; नदीच्या ७२ किमींचा प्रवास साकारतोय चित्ररुपात

googlenewsNext
ठळक मुद्दे२४४ फूट लांबीची भिंत रंगवताहेत कलाकारनदी परिक्रमा सारखी अनुभूती

औरंगाबाद : खाम नदी पुनरुज्जीवित होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या औरंगाबादकरांसाठी खूशखबर आहे. नदी पात्राच्या सौंदर्यीकरणात आणखी भर पडत आहे. ती म्हणजे, नदीच्या काठावरील २४४ फूट लांबीच्या भिंतीवर खामनदीचा उगम ते गोदावरी नदीत संगमापर्यंतचा ७२ किमींचा वाहत प्रवास चित्र रुपात साकारला जात आहे.

पर्यटनाची राजधानी औरंगाबाद शहर ज्या नदीच्या काठावर वसले आहे ती खाम नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा विडा महानगरपालिका, छावणी परिषद, काही सामाजिक संस्था, अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांनी उचलला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून नदीच्या पात्राची स्वछता व सौंदर्यीकरण सुरू आहे. तब्बल ४०० वर्षांपूर्वी खामनदीच्या काठावर शहर वसले होते. मागील ७० वर्षांत या नदीचे रूपांतर नाल्यात झाले. या खाम नदीचा इतिहास व तिचा उगम ते संगमापर्यंतचा प्रवास नव्यापिढीला माहीत व्हावा, या उद्देशाने नदी प्रवास चित्र रुपात साकारला जात आहे. छावणी परिषद बाजूच्या नदी पात्रापासून या नदीच्या सौंदर्यीकरणाला सुरुवात झाली आहे. आयकर भवनला लागून असलेल्या २४४ फूट लांबीच्या संरक्षण भिंतीवर चित्र काढण्यास सुरुवात झाली आहे. चित्र अब्दुल रशीद, सुंदरलाल कुमावत, दीपक कुमावत व प्रवीण देवळे साकारत आहेत. नदीच्या प्रवासाचे डिझाइन साई सावंत यांनी रेखाटले आहे. एवढेच नव्हे तर नदीवरील उड्डाणपूल व नदीपात्रातील पाईपला रंगीत करण्यात आले आहे. पात्राच्या दोन्ही बाजूला दगडांचा थर रचला जात आहे.

नदी परिक्रमा सारखी अनुभूती
सातारा पर्वतरांगा आणि जटवाडाच्या डोंगरामधून दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम झाला आहे. त्यानंतर ही खाम नदी हर्सूल धरणात येऊन मिळते. तिथून हिमायत बागचा मागून बीबी का मकबरच्या पूर्व बाजूने पुढे जाते. मकाई गेट, पानचक्की, मेहमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा उड्डाणपुलाखालून जाते. छावणी परिषदच्या पूर्व बाजूने कर्णपुरा देवीच्या मंदिरच्या बाजूने पुढे गंगापूर तालुक्यातील येसगाव येथपर्यंत वाहत जाऊन खाम नदी अखेर गोदावरी नदीत म्हणजेच नाथसागरात जाऊन मिळते. हा ७२ किमींचा प्रवास चित्ररूपात साकारला जात आहे. हे चित्र पाहताना नागरिकांना खाम नदी परिक्रमा करून आल्याची अनुभूती येईल.

Web Title: Beautification of Kham river basin; The journey of 72 km of the river is pictured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.