सुंदर माझे कार्यालय अंतर्गत अंगणवाड्या होऊ लागल्या चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:05 IST2021-03-22T04:05:01+5:302021-03-22T04:05:01+5:30
फुलंब्री : तालुक्यातील अंगणवाड्यांचे कायापालट करण्याचे काम ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत वेगात सुरू आहे. डोंगरगाव शिव येथील अंगणवाडीची ...

सुंदर माझे कार्यालय अंतर्गत अंगणवाड्या होऊ लागल्या चकाचक
फुलंब्री : तालुक्यातील अंगणवाड्यांचे कायापालट करण्याचे काम ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत वेगात सुरू आहे. डोंगरगाव शिव येथील अंगणवाडीची केलेली सजावट ही जिल्हाभरात पॅटर्न म्हणून राबविण्यात येत आहे.
शासनाने सुरू केलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत तालुका स्तरावरील प्रत्येक कार्यालयाचा समावेश करण्यात आला आहे पण काही कार्यालयांमध्ये या अभियानाला अजूनही प्रारंभ झालेला नाही तर जिल्हा परिषद बालविकास विभागाच्यावतीने हे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्यात केवळ रंगरंगोटी करणे हा हेतू नव्हे तर कार्यालयातील कामकाजात बदल घडविणे हा त्या मागचा हेतू आहे.
तालुक्यात एकूण २९५ अंगणवाड्या आहेत. त्यातील २०८ अंगणवाड्यांना स्वताः च्या इमारती आहे तर उर्वरित अंगणवाड्या ग्रामपंचायत किंवा शाळाच्या इमारतीत चालतात. बालविकास विभागाच्यावतीने सध्या २०८ अंगणवाड्यामध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानात अंगणवाडी इमारतीच्या सुशोभीकरणाकरीता लागणारा खर्च ग्रामपंचायतीच्यावतीने दिला जात आहे. आतापर्यंत ३० ग्रामपंचायतींनी अंगणवाड्यांना आर्थिक मदत केली आहे.
डोंगरगाव शिव पॅटर्न जिल्हाभरात
फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिव येथील अंगणवाडी इमारतीला समोरच्या भागावर काढलेल्या विविध चित्राला अधिक पसंती मिळाली. हेच चित्र जिल्ह्यातील प्रत्येक इमारतीला काढले जाणार आहे. अशा प्रकारच्या सूचना जिल्हा परिषदचे महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिले आहे.
‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत अंगणवाड्या सुशोभिकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. या कामाकरिता ग्रामपंचायतीकडून आर्थिक सहकार्य मिळत आहे.
- राजेंद्र कड, तालुका बालप्रकल्प विकास अधिकारी.
--
फोटो अध्याप मिळालेला नाही. बातमीत लिहलेले होते