सिनेमा पाहण्यासाठी पैसे नसल्याने ते बनले दुचाकीचोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:54 AM2018-06-28T07:54:13+5:302018-06-28T10:43:46+5:30
चोरीच्या वस्तू विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पार्ट्या आणि सिनेमा पाहणाºया चौघांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी गेवराईत मुसक्या आवळल्या
बीड : चोरीच्या वस्तू विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पार्ट्या आणि सिनेमा पाहणाºया चौघांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी गेवराईत मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे. या टोळीतील तीन आरोपी अल्पवयीन आहेत.
संकेत कांडेकर (१८ भिमनगर, गेवराई) व इतर तिघे (१७) अशा चौघांनी चौघांनी शिरूरकासार येथील तीन दुचाकी लंपास केल्या. तसेच गेवराई शहरातील एक मोबाईल शॉपी फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना हे दुचाकीचोर गेवराईतील असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सपोनि दिलीप तेजनकर यांच्यामार्फत गेवराईत सापळा लावला. हे सर्वजण चोरीच्या दुचाकीवरून सिनेमा पाहण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांना गेवराईत बेड्या ठोकण्यात आल्या. शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघड झाल्याने त्यांना शिरूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सासरा-जावयाची दुचाकी लंपास
शिरूर येथे सासºयाकडे धोंडे जेवणासाठी आलेल्या जावयाने आपली दुचाकी रस्त्यावर उभ्ी केली होती. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून या टोळीने या दोघांच्याही दुचाकी पळविल्या होत्या.