बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीसाठी एक व्हा...

By Admin | Published: March 10, 2016 12:31 AM2016-03-10T00:31:49+5:302016-03-10T00:47:17+5:30

हणमंत गायकवाड , लातूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत.

Become one for the centenary birth anniversary of Babasaheb ... | बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीसाठी एक व्हा...

बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीसाठी एक व्हा...

googlenewsNext


हणमंत गायकवाड , लातूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत. शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून लातुरातील कार्यकर्त्यांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला सारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक व्हावे व सामाजिक ऐक्याचा संदेश महाराष्ट्राला द्यावा, असे बौद्ध धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
बुद्ध धम्म स्थळ दर्शनासाठी अमृतराव सूर्यवंशी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, लातुरातील आंबेडकरी चळवळीला मोठ्या उंचीची परंपरा आहे. सध्या आंबेडकरी समाजाची प्रतिमा विखुरलेला समाज अशी होत आहे. बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून ही प्रतिमा बदलण्याची संधी आहे. अशा सोहळ्यांतून सामूहिक नेतृत्व विकसीत होण्यासही वाव आहे. सद्य:स्थितीत सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. ही गरज ओळखून आंबेडकरी समुहाने पुरोगामी चळवळीसमोर नवा आदर्श निर्माण करावा. यापूर्वी उचित वेळी अन्यायाचा प्रतिकार करताना लातुरातील आंबेडकरी चळवळीने आपल्या संघटनशक्तीचा परिचय करून दिलेला आहे. लातूरच्या आंबेडकरी चळवळीला परंपरा आहे. टी.एम. कांबळे, व्ही.एल. सूर्यवंशी, पप्पू गायकवाड, बब्रुवान माने, महादेव चिकटे, एम.बी. कांबळे हे चळवळीतील मोठे शिलेदार होते. त्यांची स्मृती जपत आपणही आंबेडकरी चळवळीला सामाजिक ऐक्याचा नवा आयाम देणे गरजेचे आहे. भावी काळात आंबेडकरी समाजाकडून योग्य, प्रभावी, सामाजिक, राजकीय नेतृत्व अशा सामूहिक कार्यक्रमांतून विकसीत होऊ शकते. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरावी. लातुरातील कार्यकर्त्यांनी स्वनिधीवर जयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद असून, आदर्शवत आहे. जयंती कार्यक्रमातून वैचारिक मंथन होऊन ज्ञानाच्या कक्षा अधिक वाढाव्यात. त्यासाठी तरुण, महिला, कर्मचारी व ज्येष्ठांनी या जयंती उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवावा. अन्य समाज घटकांनाही सहभागी करुन घ्यावे, असेही अमृतराव सूर्यवंशी म्हणाले.

Web Title: Become one for the centenary birth anniversary of Babasaheb ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.