पोळ्याचा बाजार चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:09 AM2021-09-02T04:09:02+5:302021-09-02T04:09:02+5:30
चित्तेपिंपळगाव: आठवडीबाजारामुळे ग्रामपंचायतला महसूल मिळतो. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही सेवासुविधा देण्यात आलेल्या नाहीत. बुधवारी पोळ्याच्या बाजारात शेतकऱ्यांना चिखलात खरेदी ...
चित्तेपिंपळगाव: आठवडीबाजारामुळे ग्रामपंचायतला महसूल मिळतो. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही सेवासुविधा देण्यात आलेल्या नाहीत. बुधवारी पोळ्याच्या बाजारात शेतकऱ्यांना चिखलात खरेदी करावी लागली. कोरोना नियमांकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसले.
व्यापाऱ्यांना ओटे नसल्याने चिखलात साहित्य खरेदी करावे लागले. बाजाराची पार्किंगची सुविधा उड्डाणपुलाच्या खाली बाजूला रस्त्यावरच दुचाकी पार्किंग केल्या जातात. त्यामुळे पंचक्रोशीतील आठ ते दहा गावांच्या लोकांच्या सहकार्याने हा बाजार भरतो. ३६ वर्षे उलटले असले तरी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत.
कर घेतात सुविधांचे काय...
बाजारात व्यावसायिकाकडून करपावती ५० रूपये सक्तीने वसुली केली जाते. चिखलात बसून व्यवसाय करावा लागतो. ग्रामपंचायत सुविधा कुठल्याच देत नाही, ही खेदाची बाब आहे. प्रल्हाद पवार (व्यावसायिक)
नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणार...
कोरोना अद्याप संपलेला नसल्याने बाजारात मास्क लावावा, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, असे सुचविले आहे. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. बाजारात सेवासुविधा देण्याचा प्रयत्न वरिष्ठांच्या आदेशानुसार केला जाईल. - ए. एस. गाडेकर, ग्रामसेवक
कॅप्शन... चित्तेपिंपळगावचा आठवडीबाजार सेवासुविधांअभावी असा चिखलात भरला. पोळ्याचा बाजार असल्याने शेतकऱ्यांना चिखल तुडवत सणासाठी साहित्य खरेदी करावे लागले.