औरंगाबादेत बीडची पुनरावर्ती, अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

By संतोष हिरेमठ | Published: October 13, 2022 02:03 PM2022-10-13T14:03:23+5:302022-10-13T14:21:59+5:30

महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.

Beed case repeats in Aurangabad, woman allegedly dies during illegal abortion | औरंगाबादेत बीडची पुनरावर्ती, अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

औरंगाबादेत बीडची पुनरावर्ती, अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

googlenewsNext

औरंगाबाद : बीडप्रमाणेच औरंगाबादेत अवैध गर्भपाताचा प्रकार समोर आला आहे. अवैधरित्या गर्भपात केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

तारा सुनील शेळके असे मयत महिलेचे नाव आहे. महिलेला आधी दोन मुली आहेत. या महिलेला उपचारासाठी गंभीरावस्थेत घाटी रुग्णाला दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असताना बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला. दरम्यान, महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अवैध गर्भपातातून हा प्रकार झाल्याची शंका डॉक्टरांनी वर्तवली आहे. दरम्यान, महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनीही अवैध गर्भपात केल्यामुळेच हा प्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

 

Web Title: Beed case repeats in Aurangabad, woman allegedly dies during illegal abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.