बीडमधील ‘फाईट’ ठरणार लक्षवेधी !

By Admin | Published: June 12, 2014 11:38 PM2014-06-12T23:38:33+5:302014-06-13T00:33:04+5:30

संजय तिपाले , बीड एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा बोलबाला होता़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजकीय भूकंपानंतर चित्र बऱ्याच अंशी बदलले आहे़

Beed 'fight' to be noticeable! | बीडमधील ‘फाईट’ ठरणार लक्षवेधी !

बीडमधील ‘फाईट’ ठरणार लक्षवेधी !

googlenewsNext

संजय तिपाले , बीड
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा बोलबाला होता़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजकीय भूकंपानंतर चित्र बऱ्याच अंशी बदलले आहे़ यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे असा तिरंगी सामना रंगणार असून लढत लक्षवेधी असेल.
बीड विधानसभा मतदारसंघात गतवेळी शिवसेनेचे आमदार सुनील धांडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर यांनी ७५ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता़ बीड पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका व ७० टक्के ग्रामपंचायती ही बीडमधील राष्ट्रवादीची ताकद़ जयदत्त क्षीरसागर यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांना ३ हजार ८५५ इतके मताधिक्य मिळाले़ इतर पाचही विधानसभा मतदारसंघापेक्षा बीडमधून मुंडे यांना मिळालेली लीड तुलनेने कमीच आहे़
यावेळी देखील राष्ट्रवादीकडून क्षीरसागरच आखाड्यात उतरतील़ क्षीरसागरांचा सामना कोणाशी होतो? याकडे सर्वांच्या नजरा आहेत़ शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख अनिल जगताप याचे नाव चर्चेत आहे़ दुसरे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे हे देखील उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत़ शिवसेनेचे माजी आ़ सुनील धांडे हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या तंबूत गेले़
त्यामुळे ते मनसेकडून रिंगणात उडी घेऊ शकतात़ मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखा फड यांचाही उमेदवारीवर दावा आहे़ दुसरीकडे शिवसंग्रामचे अध्यक्ष व आ़ विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून महायुतीला साथ दिली़ त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ते बीडची जागा मागू शकतात़ मेटे व क्षीरसागर हे राष्ट्रवादीत एकत्र होते़ मात्र, त्यांच्यात फारसे कधी पटले नाही़ आता मेटे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत़ त्यामुळे ते क्षीरसागरांना कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नाहीत़
काँग्रेसचे माजी आ़ व नारायण राणे यांचे समर्थक सुरेश नवले यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे़ मेटेंप्रमाणेच ते देखील क्षीरसागरांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत़
भाजपा नेते गोपीनाथराव मुंंडे व जयदत्त क्षीरसागर यांच्या छुप्या मैत्रीची नेहमीच चर्चा होत असे;पण दुर्दैवाने आता मुंडे नाहीत़ त्यामुळे निवडणूक कोणालाही सोपी नाही़ तूर्त उमेदवारीसाठी राष्ट्रवादी वगळता इतर पक्षात जोरदार ‘लॉबिंग’ सुरु आहे़
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
राष्ट्रवादीजयदत्त क्षीरसागर १,०९१६३
शिवसेनासुनील धांडे ३३,२४६
रिपाईसय्यद सलीम ३२,९९९
इच्छुकांचे नाव पक्ष
जयदत्त क्षीरसागर राकाँ.
अनिल जगताप शिवसेना
प्रा़ सुनील धांडे मनसे
रेखा फडमनसे

Web Title: Beed 'fight' to be noticeable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.