बीड शहर झाले हागणदारी मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:21 AM2017-08-09T00:21:43+5:302017-08-09T00:21:43+5:30

बीड शहर, हागणदारीमुक्त शहर’ बनविण्याचा पालिकेने केलेला संकल्प मंगळवारी सार्थी लागला.

 Beed has been a hagar-free city | बीड शहर झाले हागणदारी मुक्त

बीड शहर झाले हागणदारी मुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘बीड शहर, हागणदारीमुक्त शहर’ बनविण्याचा पालिकेने केलेला संकल्प मंगळवारी सार्थी लागला. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष समितीने शहराची तपासणी करून बीड शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे. पालिका अधिकारी, कर्मचाºयांची मेहनत आणि त्यांना नागरिकांनी केलेले सहकार्य, यामुळेच बीड हागणदारीमुक्त झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बीड शहरात वैयक्तिक शौचालय बांधा, सार्वजनिक शौचालयांचा वापर करा, उघड्यावर शौचास जाऊ नका, यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आवाहन केले जात होते. तसेच शहरातील २७ ओ.डी.स्पॉटवर पालिका अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर कारवाई व मार्गदर्शन करण्यासाठी गुडमॉर्निंग गुड इव्हिनिंग या पथकांची स्थापना केली होती. यामध्ये तब्बल ९० अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश होता. या सर्व फौजफाट्याने परिश्रम घेतल्यानेच हे यश मिळाल्याचा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मिलींद सावंत व पांडुरंग उगले यांची समिती बीड शहर तपासणीसाठी मंगळवारी सकाळीच रस्त्यावर उतरली. सकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील इंदिरानगर भागातील ओ.डी.स्पॉटची त्यांनी पाहणी केली. येथे कोणीही उघड्यावर आले नाही. आले नाहीत, तर त्यांना काय सुविधा आहेत, याची तपासणीही करण्यात आली. तसेच वैयक्तिक शौचालयांची पाहणी करून तपासणी केली. येथील ४० ते ४० ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांसोबत संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर संस्कार विद्यालय, चंपावती विद्यालय, बलभिम महाविद्यालयातील शौचालयांची तपासणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर समितीने आपला मोर्चा सार्वजनिक शौचालयांकडे वळविला. शहरातील २८ सार्वजनिक शौचालयांची पाहणी करून त्याचा वापर होतो की नाही, हे पाहण्यात आले. भाजी मंडई, बसस्थानकातील शौचालयाचीही तपासणी करण्यात आली. सायंकाळी दिवसभराच्या तपासणीबद्दल चर्चा करून जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला. जिल्हाधिकाºयांनी स्वाक्षरी करताच बीड शहर हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.

Web Title:  Beed has been a hagar-free city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.