बीड, लातूर शासकीय तंत्रनिकेतनला मानाचे 'एनबीए' नामांकन
By योगेश पायघन | Published: December 14, 2022 04:00 PM2022-12-14T16:00:17+5:302022-12-14T16:01:22+5:30
अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांची गुणवत्ता राखण्यासाठी आणि त्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनएबी) साठी मुल्यांकन करून घेण्याचे शासनाचे निर्देश आहे.
औरंगाबाद ःबीड आणि लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रत्येकी तीन विषयांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) मिळाले आहे. २०२४ पूर्वी सर्व संस्थांचे एनबीए मुल्यांकन करून घ्यायचे आहे. यापूर्वी ४ संस्थांचे 'एनएबी' मुल्यांकन झाले असून आता दोन संस्थांत मिळाले उर्वरीत ५ संस्थांचे मुल्यांकन वर्षभरात पूर्ण करू अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे यांनी दिली.
अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांची गुणवत्ता राखण्यासाठी आणि त्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनएबी) साठी मुल्यांकन करून घेण्याचे शासनाचे निर्देश आहे. एनबीए आणि नॅक या दोन संस्था आहेत ज्या भारतातील उच्च शिक्षणाच्या संस्थांच्या सलग्नतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. एआयसीटीईद्वारे मंजूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर यासारख्या विषयांमधील डिप्लोमा स्तरापासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या अभ्यासक्रमांचे मूल्यांकन आणि मान्यता देण्याचे काम करते. औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि नांदेड शासकीय तंत्रनिकेत या संस्थांचे मुल्यांकन मिळाले आहे. उर्वरीत ५ शासकीय तंत्रनिकेतनचे मुल्यांकन वर्षभरात पुर्ण करून असे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमांचे झाले मुल्यांकन
पुरनमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेत मधिल काॅम्प्युटर इंजिनिअरींग, ईलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरींग. मेकॅनिक इंजिनिअरींग, बीड शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रिंटींग टेक्नालाॅजी, मेकॅनिकल इंजिनिअरींग, सिव्हील इंजिनिअरींग या सहा विषयांचे मुल्यांकन झाले असून ते तीन शैक्षणिक वर्षासाठी आहे. ३० जुन २०२५ पर्यंत ते वैध असणार आहे.