बीडकरांनी अनुभवला ‘डे-नाईट’ क्रिकेटचा रोमांच

By Admin | Published: March 17, 2017 11:55 PM2017-03-17T23:55:52+5:302017-03-17T23:58:29+5:30

बीड : ‘क्रिकेट फॉर पीस’ अर्थात शांततेसाठी क्रिकेट या उपक्रमांतर्गत येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर इतिहासात प्रथमच ‘डे-नाईट’ क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत.

Beedkar's experience of 'day-night' cricket is the thrill of the game | बीडकरांनी अनुभवला ‘डे-नाईट’ क्रिकेटचा रोमांच

बीडकरांनी अनुभवला ‘डे-नाईट’ क्रिकेटचा रोमांच

googlenewsNext

बीड : ‘क्रिकेट फॉर पीस’ अर्थात शांततेसाठी क्रिकेट या उपक्रमांतर्गत येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर इतिहासात प्रथमच ‘डे-नाईट’ क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.
जिल्हा पोलीस दलातर्फे २७ ठाण्यांमधील कर्मचारी व हद्दीतील उत्कृष्ट खेळाडूंचे २७ संघ या बीड पोलीस प्रीमियर लीगमध्ये उतरले आहेत.
शुक्रवारी बीड व अंबाजोगाई अपर अधीक्षक स्तरावर निवडलेल्या या दोन संघांमध्ये पहिल्या सत्रातील उपान्त्य सामना सायंकाळी खेळविण्यात आला. यामध्ये विजेत्या ठरलेल्या दोन संघांचा अंतिम सामना शनिवारी पार पडणार आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Beedkar's experience of 'day-night' cricket is the thrill of the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.