बडोदा संघाविरुद्ध बीडच्या सचिन धसने ठोकल्या १६० धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:05 AM2019-01-29T00:05:37+5:302019-01-29T00:06:00+5:30

मराठवाड्याचा उदयोन्मुख प्रतिभावान क्रिकेटपटू सचिन धस याने केलेल्या शानदार नाबाद दीडशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने मुंबई येथे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाविरुद्ध ४ बाद ३१९ अशी धावसंख्या रचताना आपली स्थिती भक्कम केली.

Beed's Sachin Dhas hit 160 against the Baroda team | बडोदा संघाविरुद्ध बीडच्या सचिन धसने ठोकल्या १६० धावा

बडोदा संघाविरुद्ध बीडच्या सचिन धसने ठोकल्या १६० धावा

googlenewsNext
ठळक मुद्देपश्चिम विभागीय स्पर्धा : महाराष्ट्राच्या ४ बाद ३१९ धावा

औरंगाबाद : मराठवाड्याचा उदयोन्मुख प्रतिभावान क्रिकेटपटू सचिन धस याने केलेल्या शानदार नाबाद दीडशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने मुंबई येथे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाविरुद्ध ४ बाद ३१९ अशी धावसंख्या रचताना आपली स्थिती भक्कम केली.
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर सुरुवात खराब झाली. सलामीवीर अरसीन कुलकर्णी (१) ए. ठक्करच्या गोलंदाजीवर तिसऱ्याच षटकात अरमानच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर साहील कड आणि अभिनंदन गायकवाड यांनी दुसºया गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली. अभिनंदन गायकवाड व साहील कड हे जम बसलेले खेळाडू २२ धावांच्या अंतरात बाद झाल्यानंतर खेळाची सूत्रे आपल्याकडे घेताना बीडच्या सचिन धस याने सुरेख फलंदाजी केली. त्याने किरण चोरमाले (११) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी ५५ आणि सुदर्शन कुंभार याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी नाबाद १६५ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राची स्थिती भक्कम केली. दिवसअखेर सचिन धस हा १८६ चेंडूंत ३४ चौकारांसह १६० आणि सुदर्शन कुंभार ७ चौकारांसह ४२ धावांवर खेळत आहेत. साहील कड याने ९ चौकारांसह ४९ व अभिनंदन गायकवाड याने ३९ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ४ बाद ३१९. (सचिन धस खेळत आहे १६०, साहील कड ४९, सुदर्शन कुंभार खेळत आहे ४२, अभिनंदन गायकवाड ३९.).

Web Title: Beed's Sachin Dhas hit 160 against the Baroda team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.