बीडच्या पथकाने हिंगोलीच्या मुलाचा नाशिकमध्ये घेतला शोध
By Admin | Published: June 28, 2017 12:34 AM2017-06-28T00:34:46+5:302017-06-28T00:37:22+5:30
बीड : अडीच वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या हिंगोलीच्या मुलाचा शोध घेण्यात बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला यश आले आहे.
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अडीच वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या हिंगोलीच्या मुलाचा शोध घेण्यात बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला यश आले आहे. हा मुलगा दिंडोरी (जि.नाशिक) येथे आढळून आला. मुलाला पाहताच जन्मदात्यांना आनंदाश्रू अनावर झाले.
रामदास ज्ञानदेव सानप (१५ रा.हुडी जि.हिंगोली) हा वाळूज (जि.औरंगाबाद) येथे आपल्या मावशीकडे राहत होता. अचानक तो घरातून गायब झाला. त्यानंतर ५ सप्टेंबर २०१५ रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहा महिने या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिसांनी केला. परंतु त्यांना रामदास आढळून आला
नाही.
सहा महिन्यानंतर नियमाप्रमाणे हा तपास बीडच्या मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे
आला.
पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने या मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. औरंगाबाद, संगमनेर, नाशिक अशा विविध भागात त्याचा शोध घेतला.
रविवारी तो दिंडोरी जवळील पिंपळगाव बसवंत येथे आढळून आला. त्यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या यशस्वी तपासाने बीड पोलिसांची मान उंचावली
आहे.
ही कारवाई फौजदार दीपाली गित्ते, शिवाजी भारती, आप्पा सानप, वाहूळ, सतीश बहिरवाळ यांनी केली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दीपाली गित्ते यांच्यासह चमूचे कौतुक
केले.