डीएमआयसीच्या कामाला सुरुवात

By Admin | Published: June 21, 2016 01:06 AM2016-06-21T01:06:07+5:302016-06-21T01:10:52+5:30

शेंद्रा : लाडगाव व करमाड परिसरातील शेतकऱ्यांनी आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत डीएमआयसीचे काम होणार नाही, असा पवित्रा घेऊन चालू असलेले काम बंद केले होते

The beginning of the DMIC work | डीएमआयसीच्या कामाला सुरुवात

डीएमआयसीच्या कामाला सुरुवात

googlenewsNext


शेंद्रा : लाडगाव व करमाड परिसरातील शेतकऱ्यांनी आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत डीएमआयसीचे काम होणार नाही, असा पवित्रा घेऊन चालू असलेले काम बंद केले होते. महिनाभरापूर्वी डीएमआयसीचे अधिकारी, शेतकरी, विधानसभा सभापती यांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळला असून, कामाला सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करते वेळेस त्यांना त्यातील पंधरा टक्के जमीन विकसित केल्यानंतर परत देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार या शेतकऱ्यांना रेल्वे लाईनपासून दूर डोंगराजवळ पंधरा टक्के जमीन देण्याची घोषणा केली. पण इतक्या दूरवर जमिनी नको म्हणून डीएमआयसीचे काम शेतकऱ्यांनी अडविले होते.
काम बंद होताच प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. लाडगाव येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत काम थांबविण्याचा ठराव मंजूर केला होता. अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना रेल्वे लाईनजवळ पंधरा टक्के जमीन देण्याची मागणी मान्य केल्यानंतरच शेतकऱ्यांचा विरोध मावळला.
करमाडचे शेतकरी प्रतीक्षेत
करमाड शिवारातील आठ गटांतील जमिनी संपादित करण्यास उशीर झाला होता. शेतातील फळबाग, विहीर, गोठा, झाडे इत्यादींचा पंचनामा केला नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी डीएमआयसीचे काम बंद केले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या आश्वासनानंतर या शेतकऱ्यांनी विरोध मागे घेतला.
अद्याप सुरुवात नाही...
सटाणा शिवारातील उड्डाणपुलासाठी भूसंपादनाला अद्याप सुरुवात झालेली नाही, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले.

Web Title: The beginning of the DMIC work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.