पर्युषण महापर्वाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:49 AM2018-09-07T00:49:36+5:302018-09-07T00:52:02+5:30

पर्वाधिराज पर्युषण महापर्वाला आज ६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या जैन स्थानकांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व विशेष प्रवचनाला आज भाविकांची गर्दी होती.

The beginnings of the supernova | पर्युषण महापर्वाला सुरुवात

पर्युषण महापर्वाला सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देधार्मिक : औरंगाबाद शहरातील जैन स्थानक व मंदिरात आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पर्वाधिराज पर्युषण महापर्वाला आज ६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या जैन स्थानकांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व विशेष प्रवचनाला आज भाविकांची गर्दी होती.
कुंभारवाडा येथील महावीर भवन येथे जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने पर्युषण पर्वाचा पहिला दिवस ‘दर्शन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. उपप्रवर्तिनी कंचनकवरजी म. सा. आदी ठाणा ६ यांचे आज प्रवचन झाले. अष्टदिवसीय अखंड नवकार महामंत्र जपालाही सुरुवात झाली.
विमलनाथ जैन मंदिर
जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्री संघाच्या वतीने जाधवमंडी येथील विमलनाथ जैन मंदिरात पर्युषण पर्वाला सुरुवात झाली. यानिमित्त मंदिर आकर्षकरीत्या सजविण्यात आले आहे. वीरसैनिक केतनभाई, विरलभाई, भावीनभाई व ऋषभभाई यांनी सकाळी ९ वाजता आरोग्याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. रात्री नाटिका सादर करण्यात आली.
शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर
सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिरात सकाळी भगवंतांचा अभिषेक, केशर पूजा, धूप पूजा, आरती करण्यात आली. सायंकाळी अहिंसा भवन येथे प्रतिक्रमण करण्यात आले. जैन संगीतकार दीपक कर्णपुरिया यांच्या भक्तिसंध्येच्या कार्यक्रमाला भाविक हजर होते.
कर्णपुरा जैन मंदिर
कर्णपुरा येथील गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर व मुनीसुव्रतस्वामी जैन श्वेतांबर ट्रस्टतर्फे कर्णपुरा येथे पर्युषण महापर्वानिमित्त पहाटे दररोज ५.३० वाजता प्रतिक्रमण करण्यात आले. सकाळी साध्वीजींचे प्रवचन झाले. दुपारी पूजा करण्यात आली व रात्री भक्तिसंगीताचा कार्यक्रम पार पडला. तसेच जोहरीवाडा येथील जैन मंदिरातही धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे.
अहिंसानगर जैन श्रावक संघ
येथे महासतीजी सुयशाश्रीजी म. सा., सूरम्यश्रीजी म.सा., सुपद्मश्रीजी म.सा., सुदक्षाश्रीजी म. सा. ठाणा ४ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्वाला सुरुवात झाली. अनेक भाविकांनी नवकार महामंत्र जप केला.
तेरापंथ भवन येथे आजपासून पर्युषण पर्व
पानदरिबा येथील तेरापंथ भवन येथे उद्या ७ सप्टेंबर रोजी पर्युषण पर्वाला सुरुवात होत आहे. आचार्यश्री महाश्रमणश्रीजीच्या आदेशानुसार येथे आराधनेसाठी उपासक प्रवक्ता सुरेंद्र सेठिया, सहयोगी उपासक डॉ. संजय हिरण यांचे आगमन झाले आहे. पुढील आठ दिवस दररोज सकाळी प्रतिक्रमण व प्रार्थना, प्रवचन, दुपारी धार्मिक चर्चा व सायंकाळी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती तेरापंथी सभेच्या वतीने कळविण्यात आली.

Web Title: The beginnings of the supernova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.