बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनतर्फे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:04 AM2021-05-31T04:04:26+5:302021-05-31T04:04:26+5:30
१३ जिल्ह्यांना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर औरंगाबाद : बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनतर्फे (पुणे) १३ जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांंना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देण्यासाठी ...
१३ जिल्ह्यांना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर
औरंगाबाद : बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनतर्फे (पुणे) १३ जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांंना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. यात शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयास रविवारी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर सुपुर्द करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देण्यात आले. याप्रसंगी युनियनचे अध्यक्ष उल्हास देसाई, नितीन जोशी, सचिन देशपांडे, शंकर शेळके, प्रदीप पारगावकर, गणेश उमरजकर, विशाल पुपल, विजय भारसाखळे, मुख्य औषध निर्माण अधिकारी पवन लोहाडे आदी उपस्थित होते. बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या सदस्यांनी स्वत:च्या वेतनातून निधी उभा करून कोरोना प्रादुर्भावात गोरगरीब रुग्णांना मदतीसाठी पाऊल टाकले. यातून ६.५० लाख रुपयांचा निधी उभा राहिला. या निधीतून औरंगाबादसह पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, जालना, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देण्यात येत आहे.
फोटो ओळ...
बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनतर्फे (पुणे) रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर सुपुर्द करण्यात आले.