दिगंबर जैन समाजाच्या वतीने शोभायात्रा
By Admin | Published: July 5, 2017 11:32 PM2017-07-05T23:32:54+5:302017-07-05T23:34:22+5:30
बोरी : जैन धर्मियांचे श्रद्धास्थान तथा आचार्य संत शिरोमणी १०८ श्री विद्यासागरजी महाराज यांच्या ५० व्या दीक्षा दिनानिमित्त बोरी येथे सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी : जैन धर्मियांचे श्रद्धास्थान तथा आचार्य संत शिरोमणी १०८ श्री विद्यासागरजी महाराज यांच्या ५० व्या दीक्षा दिनानिमित्त बोरी येथे सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने रविवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
बोरी येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी महाराज यांच्या प्रतिमेची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत चौक, मेनरोड, पेठ गल्ली, चौधरी गल्ली, राम मंदिर मार्गे शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर परत शोभायात्रा मंदिरात आल्यानंतर श्री विद्यासागर महाराज यांचे आष्टक व पूजा करण्यात आली. त्यानंतर संध्या वायकोस, राजेश चवडे, विशाल चवडे, संबर बेंडसुरे, अंकिता चाकोते यांनी महाराजांच्या जीवनचरित्रावर विचार मांडले. नेमीनाथ जैन यांनी महाराजांच्या प्रेरणेने चालू असलेल्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व रोजगार विषयक माहिती सांगून शोभायात्रेस उपस्थित असलेल्या नागरिकांचे आभार मानले. प्रवीणभाई जैन यांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी दीपक बेंडसुरे, मनोज चवडे, राजेश भागवत, विक्की वायकोस, बी. टी. बेंडसुरे, विजयकुमार चवडे, गंगाधर बेंडसुरे, ओमप्रकाश ढोकर आदींनी परिश्रम घेतले.