मारहाणप्रकरणी भावास दंडाची शिक्षा
By Admin | Published: February 17, 2015 12:06 AM2015-02-17T00:06:51+5:302015-02-17T00:37:31+5:30
जालना : बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथील रतन साळूबा दाभाडे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ उत्तम साळूबा दाभाडे व अन्य पाच आरोपींना
जालना : बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथील रतन साळूबा दाभाडे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ उत्तम साळूबा दाभाडे व अन्य पाच आरोपींना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. देशमुख यांनी ३० हजार रुपये दंडाची शिक्षा १६ फेबु्रवारी रोजी ठोठावली.
उत्तम दाभाडे, काकासाहेब उत्तम दाभाडे, सिद्धार्थ उत्तम दाभाडे, बाबासाहेब उत्तम दाभाडे, कडूबाई उत्तम दाभाडे, शोभाबाई बाळू गडकर या आरोपींनी २४ सप्टेंबर २०११ रोजी काठ्या, कुऱ्हाड व लोखंडी गजाने रतन दाभाडे यांना मारहाण केली होती. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमाखाली दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास वेगवेगळ्या कलमांमध्ये दोन, तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील दीपक कोल्हे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)