राज्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने धोत्रा येथील उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:52+5:302021-07-26T04:04:52+5:30
वादग्रस्त जागेवरील अतिक्रमण काढून सदरील जागा आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून द्यावी, यापूर्वी ग्रामपंचायतने घेतलेला वादग्रस्त ठराव रद्द करावा, असे ...
वादग्रस्त जागेवरील अतिक्रमण काढून सदरील जागा आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून द्यावी, यापूर्वी ग्रामपंचायतने घेतलेला वादग्रस्त ठराव रद्द करावा, असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले. समतेचा संदेश देणाऱ्या सिद्धेश्वर महाराजांचा आदर्श समोर ठेवून गावात सामाजिक एकोपा कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच गावात सुरू असलेल्या सामाजिक सभागृहाला १० लाख रुपयांचा वाढीव निधी देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि. गिरीधर ठाकूर, नरसिंग चव्हाण, सतीश ताठे, रामराव जाधव, अशोक जाधव, नंदकिशोर जाधव आदी उपस्थित होते.
फोटो :
250721\img-20210725-wa0272.jpg
क्याप्शन
धोत्रा येथील तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडवताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोबत उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर दिसत आहे.