औरंगाबाद जिल्ह्यात अडीच लाख कुटुंबीय ‘आयुष्यमान भारत’चे लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:04 PM2018-09-22T23:04:56+5:302018-09-22T23:05:41+5:30
औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.
औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.
‘आयुष्यमान भारत’ म्हणजे राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण, कोणत्याही आजारावर देशभरातील रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. आरोग्य विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ सुमारे ८३ लाख लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १ लाख ४७ हजार कुटुंबीय, तर शहरात सुमारे ९५ हजार कुटुंबीय या योजनेचे लाभार्थी आहेत. किमान १२ लाखांवर लोकांना या योजनेतून उपचार मिळणार आहेत. या योजनेबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनाही सुरू राहणार आहे.
घाटीत उपचार
पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा, महिला रुग्णालयांत या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होणार आहे. औरंगाबादेत जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित नसल्याने केवळ घाटी रुग्णालयात या योजनेतून उपचार होणार आहेत. योजनेतून होणारे उपचार होणार, योजनेची अंमलबजावणी आदींसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे देण्यात येणार आहे.
योजनेचा पहिला टप्पा
आगामी काही दिवसांत लाभार्थीच्या संख्येत आणखी वाढ होईल. पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय, जिल्हा रुग्णालयांत, महिला रुग्णालयांत ही योजना राबविण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक