घरकुल योजनेचे लाभार्थी वाढीव लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:59 PM2017-08-04T23:59:04+5:302017-08-04T23:59:04+5:30
पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुलसह राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनेतील घरकुल कामातील अकुशल कामांच्या जवळपास ३२ हजारांच्या निधीपासून लाभार्थी वंचित राहात आहेत. त्याचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकास राष्टÑवादी काँग्रेस पार्टीतर्फे शुक्रवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुलसह राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनेतील घरकुल कामातील अकुशल कामांच्या जवळपास ३२ हजारांच्या निधीपासून लाभार्थी वंचित राहात आहेत. त्याचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकास राष्टÑवादी काँग्रेस पार्टीतर्फे शुक्रवारी दिले.
हिंगोली तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना तसेच राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनेतून घरकुल बांधकामाची कामे मंजूर आहेत तर काही कामे सुरु आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल १८००० हजारपर्यंत देणे गरजेचे होते मात्र दिलेले नाहीत. तसेच याच योजनेत घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. तसेच नवभारत योजनेंतर्गत प्रतिघरकुल शौचालय बांधकामासाठी १२ हजार असे एकूण दीड लाख रुपयांच्या निधीबाबत गटविकास अधिकाºयांकडे पाठपुरावा करुनही काहीच कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हजारो लाभार्थी या निधीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी तालुका अध्यक्ष माधव कोरडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.