शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी हैराण
By Admin | Published: July 17, 2017 11:24 PM2017-07-17T23:24:20+5:302017-07-17T23:30:40+5:30
पानकनेरगाव :सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे ग्रामपंचायततर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाच्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून चार ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना त्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत.
सेनगाव येथे पंचायत समितीला चकरा मारून लाभार्थी परेशान आहेत. काही लाभार्थ्यांनी उसनवारी करून शौचालयाचे काम केलेले आहे. पाच ते सहा महिन्यांपासून अद्याप शौचालयाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदान लवकर मिळत नसल्याने याबाबत लाभार्थी हैराण झालेले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये चकरा मारून त्रस्त झालेले आहेत. ग्रामसेवक निलंबित झाल्यानंतर कोणाची नियुक्ती झाली आहे, हेसुद्धा येथील नागरिकांना माहीत नाही. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन शौचालय अनुदान त्वरित देऊन कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.