लाभक्षेत्रातील खरीप हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:02 AM2021-07-08T04:02:57+5:302021-07-08T04:02:57+5:30

संजय जाधव पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी ...

Benefit kharif season in jeopardy | लाभक्षेत्रातील खरीप हंगाम धोक्यात

लाभक्षेत्रातील खरीप हंगाम धोक्यात

googlenewsNext

संजय जाधव

पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने, शेतकऱ्यांनी त्या अनुषंगाने मागणी केली आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता गोर्डे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठविला आहे.

पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील एक लाख ८३ हजार ३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपत आहेत. कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते, याबाबत लवकर निर्णय न झाल्यास लाभक्षेत्रातील पिके हातून जाण्याचा धोका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुळा भंडारदरा व दारणा धरणातून कालव्याद्वारे आवर्तनाबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा.

---- डावा कालव्यावर १,४१,६४० हे. सिंचन ------

जायकवाडी धरणाच्या २०८ किमी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात औरंगाबादेत ७,६२०, जालन्यात ३६,५८० तर परभणीत ९७,४४० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली असून, पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत.

----- उजव्या कालव्यावर ४१,६८२ हे सिंचन ------

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी लांबीचा असून, यात औरंगाबादेतील १,४३२, बीडमधील ३७,९६० तर अहमदनगरमधील २,२९० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. या पिकांना आता पाण्याची गरज आहे

--------

पैठणमधील ९,०५२ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात

तालुक्यात डाव्या कालव्यावर ७,६२० हेक्टर क्षेत्र व उजव्या कालव्यावर १,४३२ हेक्टर क्षेत्रातील २८ गावांत खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिके करपत असून, वेळेवर धरणातून पाणी मिळाले, तरच ही पिके वाचणार आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून खरीप संरक्षण पाळी सोडण्यात यावी, तसेच धरणातून तालुक्यातील खेर्डा मध्यम प्रकल्प आणि आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे.

Web Title: Benefit kharif season in jeopardy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.