पैठण तालुक्यात विहिरी, बोअर घेण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:12 AM2018-12-08T00:12:05+5:302018-12-08T00:12:54+5:30

यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.

 Between the wells of Paithan taluka and the boiler | पैठण तालुक्यात विहिरी, बोअर घेण्याचा धडाका

पैठण तालुक्यात विहिरी, बोअर घेण्याचा धडाका

googlenewsNext

अंकुश वाघ
पैठण : यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.
तालुक्यात ४०० ते ५०० फुटापर्यंत बोअर खोदले जात असल्याने जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे. तसेच नवीन विहीर खोदकामासह जुन्या विहिरीतसुध्दा आडवे बोअर मारण्यात येत आहेत. मोजक्या शिल्लक राहिलेल्या फळबागा वाचविण्साठी शेतकरी जीवाचे रान करत असल्याचे तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यात मागील सलग बारा वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस पडू लागल्यामुळे म्हणावे तसे पाणी जमिनीत मुरले नाही. यंदा तर पावसाचे प्रमाण फारच नगण्य राहिल्याने याचा फटका खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकालाही बसला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.
पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम
हिवाळ्यात जमिनीत ओलावा राहिला नाही तर आगामी उन्हाळ्याचा विचार न केलेला बरा. ऊस लागवड करणारे शेतकरी पुन्हा संकटात सापडून लागवड केलेला ऊस जगविण्यासाठी धडपड करत आहेत. गतवर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे ऊस पिकासह, मोसंबी, डाळींबाची मोठ्या प्रमाणात लागवड वाढ झाली. जलयुक्त शिवाराचा मोठा गाजावाजा झाला अन् यशही आले. यावर उसाची लागवड शेतकऱ्यांनी केली. सलग पडलेल्या दुष्काळामुळे पाणीपातळीत प्रचंड घट झाल्याने ती झिजच भरून निघाली नाही. यावर्षी तर पावसाळा कधी आला, कधी संपला, हे कळलेच नाही. बागा सुकू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी पुन्हा शेतकरी धडपड करत नवीन बोअर घेण्यासह विहिरी खोदण्याचा सपाटा लावत आहेत. परंतु चारशे ते पाचशे फूट खोल बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने दुहेरी खर्च करून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. बोअरवेलधारक खोलीची मर्यादा असलेले नियम धाब्यावर बसवून चार पाचशे फूट खोल बोअर बिनधास्त घालत असून यामुळे जमिनीची चाळणी होऊन धरणीचा समतोल बिघडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी पिके पावसाअभावी शेतकºयाच्या हातातून गेल्याने त्यांची आतापासूनच आर्थिक ओढाताण होण्यास सुरूवात झाली आहे. जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने याचा परिणाम पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. तालुक्यातील आडूळ, बालानगर, चितेगाव, कडेठाण, पारुंडी येथील ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. बागायती शेतींना पाण्याचे नियोजन करता करता नाकीनऊ येत आहे. तालुक्यात दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फाटका बसत असल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाण्याची टंचाई जाणवत असते.
भूजल अधिनियमानुसार कोणतीही व्यक्ती अथवा संस्था विनापरवाना पाण्याचा उपसा करु शकत नाही. बोअर खोदणाºया मशीन व्यावसायिकांना जिल्हाधिकारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे नोंद करणे बंधनकारक केले आहे. मात्र हा नियम कुणीही पाळत नसल्याने जमिनीची चाळणी होत आहे.

Web Title:  Between the wells of Paithan taluka and the boiler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.