औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 12:31 PM2022-01-20T12:31:11+5:302022-01-20T12:31:37+5:30
शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही वाढतोय उद्रेक
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्या एक हजार पार गेली. दिवसभरात तब्बल १०९७ रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ७६७ आणि ग्रामीण भागातील ३३० रुग्णांचा समावेश आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात बरे झालेल्या तब्बल ५८० रुग्णांना सुटी देण्यात आली. तिसऱ्या लाटेतील कोरोनामुक्त रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये शहरातील पाचशे आणि ग्रामीण भागातील ८० रुग्णांचा समावेश आहे. गेले काही दिवस केवळ शहरात सर्वाधिक रुग्णांची भर पडत होती. मात्र, बुधवारी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या थेट तीनशेपार गेली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. ग्रामीण भागात गंगापूर तालुक्यात बुधवारी सर्वाधिक रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना भीमनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, रोशनगेट येथील ६५ वर्षीय पुरुष, शहानूरवाडी येथील ८२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
समर्थनगर २, बिडकीन १, घाटी परिसर २, हर्सूल १, भारतनगर १, आरेफ कॉलनी १, हिलाल कॉलनी १, मिलिट्री हॉस्पिटल १, मयूर पार्क १, एअरपोर्ट स्टॉप १, नागेश्वरवाडी ३, चेलीपुरा १, बायजीपुरा २, हडको ३, राजाबाजार १, रोशन गेट १, जालना रोड १, बीड बायपास २, रशीदपुरा १, सिग्मा हॉस्पिटल परिसर ८, इटखेडा ६, पडेगाव ५, रेल्वेस्टेशन २, आर्मी कॅम्प २, पेठेनगर १, नंदनवन कॉलनी ३, बेगमपुरा २, मिटमिटा ३, जाधववाडी २,पहाडसिंगपुरा १, भावसिंगपुरा २, छावणी २, नक्षत्रवाडी १, उस्मानपुरा १०, झांबड इस्टेट १, संजयनगर १, गुलमंडी १, स्मार्ट सिटी १, गांधीनगर १, क्रांती चौक २, खडकेश्वर २, ज्योतीनगर ४, दर्गा रोड १, श्रेयनगर ३, संग्रामनगर १, शहानूरवाडी १, कांचनवाडी २, हनुमाननगर १, बाबा पेट्रोल पंप परिसर १, उदयनगर १, औरंगपुरा १, वेदांतनगर २, पैठण रोड १, गादिया विहार २, सातारा परिसर २, मिटमिटा १, अन्य ६५७.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद तालुका ७५, फुलंब्री १२, गंगापूर ८६, कन्नड ३५, खुलताबाद ६, सिल्लोड २२, वैजापूर ४१, पैठण ५०, सोयगाव ३.