खबरदार! रस्त्यावर कचरा टाकाल तर... जागेवरच दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:09 AM2018-08-08T00:09:59+5:302018-08-08T00:10:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना बुधवारपासून जागेवरच दंड आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. दंड ...

Beware! If the street was removed in the garbage ... penalty on the spot | खबरदार! रस्त्यावर कचरा टाकाल तर... जागेवरच दंड

खबरदार! रस्त्यावर कचरा टाकाल तर... जागेवरच दंड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना बुधवारपासून जागेवरच दंड आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. दंड आकारणीसाठी झोननिहाय पथकेही तयार केली आहेत. इंदूर महापालिकेने नागरिकांना जशी शिस्त लावली, तशीच पावले मनपा उचलणार असल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख नंदकुमार भोंबे यांनी दिली.
मागील काही दिवसांमध्ये महापालिकेने शहरात ठिकठिकाणी साचणारा कचरा शंभर टक्के उचलला आहे. हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रांवर दररोज कचरा नेण्यात येत आहे. तेथे कचºयावर प्रक्रियासुद्धा केली जात आहे. कचºयाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी झोननिहाय मशीन बसविणे, मुख्य कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी कामांच्या निविदाही अंतिम टप्प्यात आहेत. महापालिका सर्वच कचराकुंड्या हटवीत आहे. नागरिकांनी दररोज सकाळी कचरा घंटागाडीतच टाकावा म्हणून आग्रह धरण्यात येत आहे. ओला व सुका कचरा नागरिकांनी वेगळा करून दिल्यास त्यावर प्रक्रिया करणे सोपे आहे. एकत्रित कचरा वेगळा करणे मनपाला अशक्य आहे. नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी इंदूर पॅटर्ननुसार जागेवरच दंड आकारण्यासाठी ११ जुलैच्या सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव दिला. सर्वसाधारण सभेनेही दंड आकारणीच्या दराला मंजुरी दिली.
असा आहे दंड
रस्त्यावर कचरा टाकल्यास
१५० रुपये
हॉटेल, दुकाने, व्यावसायिकांना
५०० रुपये
जास्त कचरा निर्माण करणाºयांना
५,००० रुपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
१०० रुपये
उघड्यावर लघुशंका करणे
१०० रुपये
उघड्यावर शौच करणे
५०० रुपये
खाजगी कंत्राटदार नेमणार
शहरातील प्रत्येक घरातून कचरा संकलनासाठी खाजगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मनपाने निविदा प्रक्रियाही सुरू केलेली आहे. लवकरच कचरा संकलन कंत्राटदाराकडे सोपविण्यात येणार आहे. इंदूर महापालिका एका मालमत्ताधारकाकडून दोन रुपये वसूल करीत आहे. औरंगाबाद मनपा कंत्राटदार नेमल्यावर एक रुपया शुल्क दररोजप्रमाणे घेणार आहे.

Web Title: Beware! If the street was removed in the garbage ... penalty on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.